Tarun Bharat

आयपीएल ‘बेटिंग’ प्रकरणी चौघांना अटक

1.25 लाख रोकड जप्त, – पोलिसांचा पर्वरीतील हॉटेलवर छापा

प्रतिनिधी/ म्हापसा

सध्या देशात आयपीएल क्रिकेट प्रीमियर लिग स्पर्धा अंतिम टप्प्यात असल्याने मोठय़ा प्रमाणात गोव्यातून बेटिंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर क्राईम ब्राँचने काल शुक्रवारी रात्री उशिरा पर्वरीतील एका नामांकित हॉटेलवर छापा मारून चार जणांना बेटिंग व जुगारप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून 1.25 लाखांच्या रोख रक्कम व 60 हजारांचे बेटिंगसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी दिली.

या छाप्यावेळी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सुनील संतोष धुंका (37 वर्षे), विजय सुनील मोतिजा (27), हिरो सजनदास उदासी(37) व अनिल हसमतराय रोचनी (51 वषे) यांचा समावेश असून हे सर्वजण ठाणे महाराष्ट्र येथील रहिवासी आहे. बेटिंग तसेच जुगारासाठी वापरलेले लॅपटॉप, मोबाईल्स पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील गुजरात टायटन व राजस्थान रॉयल्स या दोन संघामध्ये क्रिकेट सामना सुरू असताना संशयित देशातील तसेच परदेशातील विविध भागामधून ऑनलाईन बेटिंग स्वीकारत होते. निरीक्षक राहुल परब यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आयपीएल क्रिकेट प्रीमियर लिग स्पर्धा सुरू झाल्यानंतर बेटिंग व्यवहारासाठी अनेकजण गोव्यातील हॉटेलात खोली आरक्षित करून हा बेटिंगचा जुगार खेळत आहेत. ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा कळंगूट तसेच पर्वरी पोलिसांनीही या स्पर्धेतील बेटिंगप्रकरणी काही हॉटेलवर छापा मारून या बेटिंग बुकींना अटक केली होती. त्यामुळे काहींनी आपले बस्थान गोव्यातून हलविले होते. ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असून क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावणारे अनेकजण आहेत. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने व हॉटेलमध्ये बेटिंगचा व्यवहार करणे सहज सोपे असल्याने बेटिंग बुकी गोवा हे ठिकाण निवडतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

येत्या काही दिवसांत या क्रिकेट सामन्यांच्या बेटिंगसाठी मोठय़ा उलाढाली होण्याची शक्यता असल्याने हॉटेल चालकांना, असे बेटिंगबुकी आढळून आल्यास त्याची माहिती त्वरित पोलिसांना देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा तसेच क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी या बेटिंग जुगारावर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेषातील पोलिसांवर ही कामगिरी सोपविण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली.

Related Stories

विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसिकरण करुन परीक्षा घ्या !

Amit Kulkarni

अवधूत नाईक यांची अनुसूचित महामंडळावर निवड

Amit Kulkarni

अन् तिचे ठरले अखेरचे मतदान

Amit Kulkarni

पाच महिन्यात 110 जणांचा अपघाती मृत्यू

Amit Kulkarni

महाशिवरात्रीला रामदेव बाबांच्या सानिध्याची गोमंतकीयांना पर्वणी

Amit Kulkarni

कृतीशील जीवन जगताना भरपूर वाचन करा

Amit Kulkarni