Tarun Bharat

आयपीएल सट्टयातील 38 लाखांची रोकड पोलिसांकडून जप्त

Advertisements

सोलापूर / प्रतिनिधी

 आयपीएल क्रिकेटचा सट्टयावरील कारवाई शहर गुन्हे शाखेकडून  सुरु असून शहर गुन्हे शाखेने आयपीएल सट्ट्यातील देवाण-घेवाण करण्यासाठी बाळगलेली 38 लाख 50 हजारांची रोकड व साधने असा 38 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसां कडून 1 कोटी 30 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शहर गुन्हे शाखेने 6 नोव्हेंबर रोजी अवंतीनगर भाग 2 मधील पर्ल हाईटच्या फ्लॅट नं. 2 या ठिकाणी कारवाई करुन आरोपी चेतन रामचंद्र वन्नाल (रा. गांधीनगर झोपडपट्टी नं -3), विग्नेश नागनाथ गाजूल (रा. भद्रावती पेठ) हे आयपीएल क्रिकेट सामन्यांवर मोबाईलद्वारे सट्टा घेत असताना मिळून आले होते. गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यागुन्ह्यातील आयपीएल सट्टा व जुगाराचे बेकायदेशीर अवैध व्यवसायातून मिळविलेली व देवाण – घेवाण करण्यासाठी लागणारी रक्कम अटक आरोपी दिपककुमार घनश्याम जोशी (रा. जोशी मोहल्ला पिंपलगांव, गुजरात सध्या रा. उमा नगरी भाग 5 जुनी मिल कंपाऊड) याने त्याच्या घरात बाळगल्याचा संशय निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने पथकाने सोमवारी त्याच्या घराची झडती घेतली असता आयपीएल सट्टा व्यवसायातून देवाण-घेवाण करण्याकरीता बाळगलेली रोख रक्कम 38 लाख 50 हजार रुपये तसेच नोटा मोजण्याचे दोन मशिन, फेक नोट डिटेक्टर मशिन असे 22 हजार 700 रुपयांची साधने, कागदपत्रे जप्त केली आहेत.

सदर गुन्ह्याच्या तपासात आजपर्यंत सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), नागपूर येथून एकूण 11 आरोपी अटक करण्यात आले आहेत. आज पर्यंत या गुन्ह्यात वापरण्यात आलेली साधने, वाहने, रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 30 लाख 47 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक तपास सुरु आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहायक निरीक्षक अजित कुंभार, सचिन बंडगर, पोलीस कर्मचारी औदुंबर आटोळे, जयसिंग भोई, संजय साळुंखे आदींनी केली आहे.

Related Stories

सोलापूर : मराठा आंदोलनात कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये नव्या ४३ कोरोना रुग्णांची भर

Archana Banage

सोलापूर : संचारबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Archana Banage

ग्लोबल टीचर रणजितसिंह डीसलेंसह त्यांची पत्नी कोरोना बाधित

Archana Banage

सोलापूर : बार्शीनजीक बस पेटवल्याप्रकरणी चौघे अटकेत

Archana Banage

सोलापूर : सव्वालाख जेष्ठ नागरिकांना मोफत हेल्थ कार्डचे वाटप

Archana Banage
error: Content is protected !!