Tarun Bharat

आयपीएल सट्टाप्रकरणी कळंगुटात टोळी गजाआड

दोन लाखाचे जुगार साहित्य जप्त

प्रतिनिधी /पणजी

आयपीएल सट्टा घेणारी टोळी गुन्हा अन्वेषण विभागाने नायकावाडो-कळंगूट येथील एका गेस्ट हाऊजावर छापा टाकून गजाआड केली असून दोन लाख रुपये किमतीचे जुगार साहित्य जप्त केले.

याप्रकरणी राजस्थान येथील चौघांना अटक करण्यात आली आहे. प्रतापसिंग, राजवीर सिंग, मोहनलाल रोहिता सिंग, अजय सिंग अशी त्यांची नावे आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या 28 सप्टेंबर रोजी झालेल्या आयपीएल मॅचच्यावेळी सट्टा घेताना या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलीस निरीक्षक राहुल परब, निरीक्षक नारायण चिमुलकर, उपनिरीक्षक नितीन हळर्णकर, हवालदार अशोक गावडे, कॉन्स्टेबल विनायक सावंत, कल्पेश तोरस्कर, संदेश कांबळे या पोलिसांच्या टीमने नायकावाडा-कळंगूट येथील डिसोझा गेस्ट हाऊसवर छापा टाकला होता. उपनिरीक्षक नितीन हळर्णकर पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

मांद्रेत ‘संगीत रंकाचे राज्य’ नाटकावर चर्चा

Amit Kulkarni

खाण अवलंबित, मच्छीमारांना भेटणार राहुल गांधी

Amit Kulkarni

गोमंतकीयांचा जीव धोक्यात घालून सनबर्न नकोच

Patil_p

मुंडकारी खटले जलदगतीने निकाली काढा

Omkar B

एफसीएनयू क्रिकेट टी-20 चषकाचे मानकरी रुलर्सचा संघ

Amit Kulkarni

राज्यात विविध शिवमंदिरात महाशिवरात्री उत्साहात

Amit Kulkarni