Tarun Bharat

आयपीएल स्थगित झाल्यानंतर शहरात गल्ली क्रिकेटचा अवलंब

बेळगावः बीसीसीआयने काही संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक शौकिनांचा हिरमोड झाला. मात्र शहरातील अनेक हौशी क्रिकेटपटू आता गल्ली क्रिकेटचा आनंद लुटण्यावर समाधान मानत असल्याचे दिसून आले आहे. जिल्हय़ातील अनेक क्रिकेटपटू आपल्या टीव्हीवर आयपीएलचे सामने पाहण्यात मग्न होते. या काळात लॉकडाऊन नसल्यामुळे मैदानावर फुल पीच व हाफ पीच क्रिकेटचा अवलंब केला होता. त्यामुळे शाळा नसली तरी मैदानावर आपला वेळ घालवत होते. परंतु या महिन्यात कोरोनाचा उद्रेक प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे सरकारने प्रथम 15 दिवसांचे क्लोजडाऊन जाहीर केले आणि आता 10 ते 24 मे या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीत मैदानावर खेळण्यास मज्जाव असल्यामुळे आता हे हौशी खेळाडू मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टींकडे वळलेले दिसून येत आहेत. परंतु क्लोजडाऊनच्या काळात मात्र हे खेळाडू गल्ली क्रिकेटचा अवलंब करीत होते. या काळात अनेक गल्ल्यांमध्ये बॅरिकेड्स घातल्यामुळे रहदारीचा प्रश्न उद्भवत नव्हता. त्यामुळे खुल्या रस्त्यांवर गल्ली क्रिकेटचा अवलंब केला. त्यांच्याप्रमाणे मुली व महिलाही शटल बॅडमिंटन, थ्रो बॉल, पूर्वीच्या घरगुती खेळांना पसंती दाखवत त्याचा आनंद घेतला. महिलांचा आवडता खेळ म्हणजे सोंगटय़ाचा खेळ. घरातच खेळता येण्यासारखा हा खेळ असल्याने त्याचाही क्लोजडाऊनमध्ये अवलंब करण्यात आला. याशिवाय मोबाईलमधील लूडो खेळाचेही प्रस्थ वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळेच मुले, मुली, महिला व पुरूष मंडळींनी आपला टाईमपास या खेळाद्वारे करीत असलेले दिसून येत आहे. उन्हाळी सुटीत बेळगावमधील वेगवेगळय़ा स्पोर्ट्स क्लबतर्फे सर्व खेळांची शिबिरे भरविली जातात. पण गेली दोन वर्षे महामारीमुळे शिबिरापासून खेळाडूंना वंचित रहावे लागले आहे. काही विद्यार्थ्यांनी शिबिरांची नोंदणी केली होती. पण कोरोना झपाटय़ाने वाढल्यामुळे ही शिबिरे रद्द करण्यात आली आहेत. शिबिरासाठी लागणारे साहित्य या खेळाडूंनी आणले होते. पण शिबिरच रद्दमुळे पालकांना मात्र भुर्दंड सोसावा लागला आहे.

Related Stories

कंट्रोल ऍन्ड कमांड सेंटरचे आज उद्घाटन

Patil_p

आरसीयूच्या मनमानीमुळे डिप्लोमा विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

Amit Kulkarni

विश्रुत स्ट्रायकर्स, अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Amit Kulkarni

रिंगरोडविरोधात 28 रोजी भव्य मोर्चा

Amit Kulkarni

कारवार बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

कचेरी गल्ली येथे दीड महिन्यापासून पाणीगळती

Amit Kulkarni