Tarun Bharat

आयपीएल स्पर्धेत दिल्लीचे नेतृत्व पुन्हा पंतकडे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2021 आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविले जाणार आहेत. या सामन्यांसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व पुन्हा ऋषभ पंतकडे सोपविण्यात येणार असल्याचे समजते. दिल्ली संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर पंतच्या नेतृत्वाखाली खेळेल.

कोरोना महामारीमुळे 2021 आयपीएल स्पर्धा अर्धवट स्थितीमध्ये तहकूब करावी लागली होती. आता या स्पर्धेतील उर्वरित सामने (दुसरा टप्पा) संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यात येणार आहे. मध्यंतरी श्रेयस अय्यरला खांदा दुखापतीची समस्या झाल्याने तो या स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकला नव्हता. त्याची ही दुखापत आता बरी झाली असून तो या स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यासाठी उपलब्ध राहणार आहे. मात्र, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली तो या संघातून खेळणार आहे.

या स्पर्धेच्या गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ आघाडीवर असून त्यांनी आठपैकी सहा सामने जिंकले आहेत. श्रेयस अय्यर हा यापूर्वीच संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाला असून तो आपल्या संघाच्या तंदुरुस्ती प्रशिक्षकासमवेत सराव करीत आहे. दिल्ली संघाच्या कर्णधारपदाच्या समस्येवर अद्याप संघ व्यवस्थापनाने अंतिम निर्णय घेतला नसल्याचे समजते.

2021 आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यासाठी ऋषभ पंतकडेच नेतृत्व सोपविण्याचा निर्णय या संघाचे प्रँचायजी किरणकुमार ग्रंथी आणि पार्थ जिंदाल यांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या निर्णयासंदर्भात ग्रंथी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही. श्रेयस अय्यर सरावावर भर देत आहे. दिल्ली संघातून पुन्हा चांगली कामगिरी करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

Related Stories

द.आफ्रिका-इंग्लंड वनडे मालिका रद्द

Patil_p

रशियन टेनिसपटू मेदव्हेदेवला कोरोनाची लागण

Patil_p

कार्लसनला धक्का देत वेस्ली सो विजेता

Patil_p

डेव्हिस चषक स्पर्धेत भारताची लढत नॉर्वेशी

Patil_p

रशियाचा रूबलेव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

दोन तुल्यबळ संघांची लढत आज

Patil_p