Tarun Bharat

आयफोन ग्राहकांना मिळणार पुढील आठवडय़ापासून 5जी सेवा

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जगातील दिग्गज आयफोन निर्माती कंपनी ऍपल लवकरच भारतात आपल्या आयफोन ग्राहक, वापरकर्त्यांसाठी 5 जी बीटा अपडेट सुरुवात करेल. याद्वारे आयफोन वापरकर्ते रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे 5जी नेटवर्क वापरू शकतील. नवीन अपडेट पुढील आठवडय़ापासून येणार आहे. 

हे नवीन अपडेट ऍपलच्या बीटा सॉफ्टवेअर प्रोग्रामअंतर्गत उपलब्ध केले जाईल. ऍपलची ही घोषणा देशातील काही भागांमध्ये 5जी नेटवर्कच्या रोल आउटच्या एका महिन्यानंतर आली आहे.

समावेश असणारे आयफोन

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार ऍपल आयफोन 14 आवृत्ती, आयफोन 13, आयफोन 12 आणि आयफोन एसइच्या ग्राहकांना लवकरच 5जी फिचर्स वापरण्यास मिळणार असल्याची माहिती आहे. यासोबतच सदरची सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या सेवांचीही आवश्यकता भासणार आहे.

5जी संदर्भातील ऍपलची पुष्टी

ऍपलने मागील महिन्यात पुष्टी केली होती, ती 5 जी सेवेच्या विस्तृत रोलआउटसाठी या वर्षीच्या डिसेंबरमध्ये 5-जी सॉफ्टवेअर अपडेट रोल आउट करणार असल्याचेही म्हटले होते.

Related Stories

स्मार्टफोन्स उत्सवी काळात मिळणार सवलतीत

Patil_p

देशाची स्मार्टफोन निर्यात 1.5 अब्ज डॉलर्सवर ?

Patil_p

‘एअरपॉड मॅक्स’चे ऍपलकडून लाँचिंग

Omkar B

Twitter: ट्विटरचं आणखी एक नवं फीचर; कसे वापरावे जाणून घ्या सविस्तर

Archana Banage

नोकियाचा जी-11 प्लस स्मार्टफोन लाँच

Patil_p

फाईव्ह जी टॅबलेट

Omkar B
error: Content is protected !!