Tarun Bharat

‘आयफोन 13 मिनी’चा फोटो लिक

Advertisements

नवी दिल्ली 

 ऍपलने आपल्या ‘स्प्रिंग लोडेड इव्हेंट-2021’मध्ये नवीन आयपॅड प्रो सादर करण्यासोबत अन्य उत्पादने सादर केली आहेत. या कार्यक्रमानंतर आता आयफोन 13 मिनी या आयफोनचे फोटो समोर आले आहेत. सदर फोटोमध्ये फोनचे बॅक पॅनेल दिसत असून अन्य वेगळेपणही स्पष्ट होत आहे. तसेच आयफोन 13 मिनी प्रोटोटाइपचा हा फोटो आयफोन 12 मिनी या मॉडेलसोबत मिळताजुळता असल्याचे जीएसएम एरिना यांनी सादर केलेल्या अहवालामधून स्पष्ट केले आहे.

आयफोन 13 मिनीच्या बॅक पॅनेलवर डबल रियर कॅमेरा दिसून येत आहे. याला क्रॉस डिझाइनमध्ये सेटअप केले आहे. वर लेंससोबत एलइडी फ्लॅश दिला असून कॅमेरा किती मेगापिक्सल आहे, या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

2022 मध्ये मिनी आयफोन बंद?

ऍपल 2022 मध्ये आयफोन बंद करण्याच्या तयारीत आहे, असेही समजते. टीएफ सिक्युरिटी ऍनालिस्ट मिंगची कुओ यांच्या मतानुसार कंपनी एक वर्षानंतर 5.4 इंच स्क्रीन असणारा मिनी आयफोन बंद करणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

एस्कॉर्ट ट्रक्टर्सची विक्री 80 टक्क्मयांनी तेजीत

Patil_p

इलेक्ट्रीक वाहनांसाठी हय़ुंडाईची योजना तयार

Patil_p

भारतीय सूत जगात सर्वात स्वस्त, निर्यात-

Patil_p

टीसीएस कर्मचाऱयांचे वाढवणार वेतन

Patil_p

मसाला विक्रीमध्ये झाली घसरण

Patil_p

मर्सीडीज-बेंझच्या कार्यकारी संचालकपदी व्यंकटेश कुलकर्णी

Patil_p
error: Content is protected !!