Tarun Bharat

आयर्लंडचे माजी क्रिकेटपटू टोरेन्स कालवश

वृत्तसंस्था/ डब्लिन

आयर्लंडचे माजी क्रिकेटपटू तसेच संघ व्यवस्थापक रॉय टोरेन्स यांचे वयाच्या 72 वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. आयर्लंडच्या क्रिकेट संघटनेतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

टोरेन्स यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 1966 ते 1984 या कालावधीत 30 सामन्यात आयर्लंडचे प्रतिनिधीत्व केले होते. टोरेन्स यांच्या व्यवस्थापनाखाली आयर्लंड संघाने 2007 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एट गटात प्रवेश करण्याचा पराक्रम केला होता. वेगवान गोलंदाज टोरेन्स यांनी 25.66 धावांच्या सरासरीने 77 गडी बाद केले आहेत. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांची आयरीश क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी तसेच निवड सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Related Stories

क्लब विश्वचषक स्पर्धेतून ऑकलंड सिटीची माघार

Patil_p

प्रसिद्ध कृष्णा 23 मे रोजी मुंबईला रवाना

Patil_p

हरियाणा शासनातर्फे ‘खेलो इंडिया’ टॉर्च रिले आयोजित

Patil_p

लाल मातीचं ऑस्कर

datta jadhav

आर. विनयकुमारचीही निवृत्तीची घोषणा

Patil_p

विंडीज संघात ड्वेन ब्रॅव्होचे पुनरागमन

Patil_p