Tarun Bharat

आयर्लंड संघाच्या कर्णधारपदी लॉरा डिलेनी

Advertisements

 वृत्तसंस्था / डब्लीन

आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी लॉरा डिलेनीची नियुक्ती करण्यात आली आहे. चालू महिन्याच्या अखेरीस झिम्बाब्वेत महिलांच्या विश्व चषक क्रिकेट पात्र फेरीची स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी शुक्रवारी आयर्लंड क्रिकेट मंडळाने 15 सदस्यांचा संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्त्व डिलेनीकडे सोपविण्यात आले आहे.

झिम्बाब्वेतील ही पात्र फेरीची महिलांची क्रिकेट स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान होणार आहे. हरारेतील चार स्टेडियम्समध्ये या स्पर्धेतील सामने खेळविले जातील. या पात्र फेरीच्या स्पर्धेमध्ये एकूण दहा संघांचा समावेश आहे. अ गटात विंडीज, लंका, आयर्लंड, हॉलंड तर ब गटात पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, झिम्बाब्वे व अमेरिका यांचा समावेश आहे. या संघांसाठी 19 नोव्हेंबरपर्यंत काही सरावाचे सामने आयोजित केले आहेत.

आयर्लंड महिला संघ – लॉरा डिलेनी (कर्णधार), जॉर्जिना डिंपेसी, ऍमी हंटर, शॉना केव्हेनेग, गॅबी लेव्हीस, लुसी लिटल, सोफी मॅक्मेहोन, जेनी मॅग्युरी, केरा मरे, ली पॉल, ओ. प्रेंडरगेस्ट, रॅक, रिचर्डसन, स्टोकेल, वेलड्रॉन.

Related Stories

भारत-द. आफ्रिका तिसरी व शेवटची वनडे आज

Patil_p

ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी विम्बल्डनची सम्राज्ञी

Patil_p

चेन्नई संघातील एका सदस्याला कोरोनाची लागण

Patil_p

वरिष्ठ महिला हॉकीपटूंचे प्रशिक्षण शिबिर आजपासून

Patil_p

…म्हणूनच धोनीने ब्रेव्होऐवजी जडेजाला गोलंदाजी दिली!

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावात खुर्दा

Patil_p
error: Content is protected !!