Tarun Bharat

आयर्विन पर्यायी पुलाच्या बांधकामाला गती

सांगली/प्रतिनिधी

सांगलीतील कृष्णा नदीवर आयर्विन पुलाला पर्यायी म्हणून उभारण्यात येत असलेल्या आणखी एका नव्या पुलाचे बांधकाम गतीने सुरू असून येत्या दिवाळीपर्यंत पुलाचे बऱ्यापैकी बांधकाम पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. सांगली शहराला आष्टा, इस्लामपूर, कराड, सातारा, पुणे, मुंबई आदी शहरांना जोडणाऱ्या नव्या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ काही महिन्यांपूर्वीच करण्यात आला सध्या आयर्विन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद असला तरी या पुलावरून सांगलीवाडीच्या दिशेने ये जा करणारी सर्व छोटी वाहने याच पुलावरून शहरात येत असतात. याशिवाय आयर्विनला पर्यायी म्हणून बायपास रोडवर काही वर्षांपूर्वी एक पूल उभारण्यात आला आहे. आता हरिपूर येथील पुलाबरोबरोबरच सांगलीमध्ये उभारण्यात येत असलेल्या नव्या पुलामुळे सांगलीकरांना चार पूल उपलब्ध होणार आहेत.

Related Stories

नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुवर्णा पवार

Abhijeet Khandekar

निर्बंध कडक… तरीही शहरात गर्दी कायम

Archana Banage

शिगाव वडगाव रस्ता वाहतुकीस बंद

Archana Banage

मिरज पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी दिलीप पाटील

Archana Banage

सांगली शहराच्या विविध प्रश्नांवरुन सभापतींसह अधिकारी धारेवर

Archana Banage

सांगली : फिडे मास्टर शाहीन सादेह ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

Archana Banage