Tarun Bharat

आयसीएमआर इमारतीमध्ये होणार कोरोना चाचणी प्रयोगशाळा

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावसाठी नव्याने मंजूर झालेल्या कोरोना चाचणीच्या नियोजित केंद्राला शनिवारी पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन पाहणी केली. नेहरूनगर येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल समोर असणाऱया आयसीएमआर राष्ट्रीय पारंपरिक चिकित्सा विज्ञान संस्थेच्या आवारात कोविड-19 प्रयोगालयाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी जगदीश शेट्टर यांनी प्रयोगालयाला लागणाऱया सामग्री, तपासणी किट सज्ज ठेवून त्वरित तपासणीचे कार्य हाती घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर आवश्यक सामग्री पुरविण्याचे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिले.

यावेळी जि. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी कमी कालावधीत अधिक नमून्यांची चाचणी सुलभ करण्यासाठी अनुकूल असलेल्या स्वयंचलित मशीन देण्याचा आदेश दिला आहे. आयसीएमआर राष्ट्रीय पारंपरिक चिकित्सा विज्ञान संस्थेचे निर्देशक डॉ. देवप्रसाद चटोपाध्याय यांनी कोविड-19 संबंधित आवश्यक सामग्री मिळताच सोमवारपासून तपासणी कार्याला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

यावेळी आमदार अनिल बेनके, जिल्हा पालक सचिव एल. के. अतिक, परिवहन संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र चोळण, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आदी उपस्थित होते.

Related Stories

रविवारी जिल्हय़ात 319 नवे रुग्ण

Amit Kulkarni

रोटरी क्लबतर्फे हब्बनहट्टी येथे आरोग्य तपासणी शिबिर

Amit Kulkarni

सुशोभिकरण गेले कचऱ्यात

Amit Kulkarni

जोतिबाचा चैत्र उत्सव यंदाही साधेपणाने

Amit Kulkarni

मतमोजणी होणार चिकोडी येथे

Patil_p

आतापर्यंत सात हजार जणांची झाली स्वॅब तपासणी

Patil_p