Tarun Bharat

‘आयसोलेशन’मध्ये आणखी पाच रुग्ण

चौघांचे नमुने तपासणीसाठी मिरजला : आणखी आठजण ‘होम क्वारंटाईन’ मुक्त

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आणखी पाच रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यातील चौघांचे नमुने कोरोना तपासणीसाठी मिरजला पाठविण्यात आले आहेत. होम क्वारंटाईन केलेल्या आणखी आठ व्यक्तींना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 93 जणांना होम क्वारंटाईन मुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दिली.

 आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोना पार्श्वभूमीवर रोजच्या रोज सर्व्हे करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्दी, ताप, खोकला असणाऱयांची माहिती घेत आहेत. त्यांची तपासणीही केली जात आहे. आतापर्यंत 2 हजार 122 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाची थोडीफार लक्षणे दिसणाऱया व्यक्तींना आवश्यकतेनुसार क्वारंटाईन केले जाते किंवा आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले जाते. त्याप्रमाणे बुधवारी आणखी पाचजणांना जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील चौघांचे नमुने तपासणीसाठी मिरजला पाठविण्यात आले आहेत. आयसोलेशन वॉर्डमध्ये सध्या 20 रुग्ण उपचाराखाली आहेत.

होम क्वारंटाईनमधून 93 व्यक्ती मुक्त

विलगीकरण कक्षामध्ये 14 दिवस आणि घरी होम क्वारंटाईनमध्ये 14 दिवस असे 28 दिवसाचे विलगीकरण संपलेल्या आणखी आठजणांना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे. एकूण 93 व्यक्तींना होम क्वारंटाईन मुक्त करण्यात आले आहे. तसेच जिल्हय़ात 53 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.  आतापर्यंत जिल्हा रुग्णालयामार्फत 70 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 66 रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातील 65 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर एकमेव पॉझिटिव्ह अहवाल आला होता. तोही आता निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना बाधित एकही रुग्ण नाही. आता नव्याने कोरोनाची किरकोळ लक्षणे असणाऱया पाचजणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

15 अधिपरिचारिका, पाच डॉक्टरांची नियुक्ती

जिल्हय़ात सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण 15 अधिपरिचारीकांना नियुक्त्या दिल्या असून त्या हजर झाल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पाच वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांचे व्हेंटीलेटर प्रशिक्षण तज्ञांमार्फत घेण्यात आले आहे.

विनाकारण फिरणाऱयांवर कारवाई

संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱयांवर पोलीस कारवाई करीत असून या कारवाईमध्ये पोलिसांनी 24 चार चाकी आणि 44 दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

24 व्यक्तेंचे समुपदेशन

मजूर व बेघर कॅम्पमध्ये असलेल्या 24 व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले आहे. यामध्ये त्यांना कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यायची काळजी, आरोग्य, स्वच्छताविषयक सवयी यांचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे. जिल्हय़ातील अशा कॅम्पमध्ये सध्या 558 व्यक्ती असून त्यांच्या निवासाची व जेवणाची सोय प्रशासनाने केली आहे.

घरीच विलगीकरण        363

संस्थात्मक विलगीकरण  053

पाठविण्यात आलेले एकूण नमुने   070

अहवाल प्राप्त झालेले नमुने          066

पॉझिटिव्ह आलेले नमुने  001

निगेटिव्ह आलेले नमुने   065

सद्यस्थितीत पॉझिटिव्ह  000

अहवाल प्राप्त न झालेले नमुने       004

विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण   020

होम क्वारंटाईन मुक्त                   093

Related Stories

दिवाळीचे कलर्स, सोबत ‘पुजारी’च्या ऑफर्स

NIKHIL_N

खेड नगर परिषदेत प्रिंटींग पेपरचाही तुटवडा!

Patil_p

खेड पोलिसांकडून अडकलेल्या दोन ट्रेकर्सची सुखरूप सुटका

Archana Banage

शाळेच्या घंटेची पूर्वतयारी सुरु

Patil_p

लांजातील 12 प्राथमिक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा

Patil_p

NIKHIL_N