Tarun Bharat

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

ऑनलाईन टीम / पुणे : 

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

बालाजी तांबे यांचा आयुर्वेदाबरोबरच प्राचीन ग्रंथांचा त्यांचा अभ्यास होता. बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ञ होते. पुणे जिह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले.

बालाजी तांबे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. यामध्ये ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते. या शिवाय त्यानी आत्मरामायण (गुजराती भाषेत), आयुर्वेदीय गर्भसंस्कार (मराठी, गुजराती, इंग्रजी), आयुर्वेदिक घरगुती औषधे (मराठी व इंग्रजी), मंत्र आरोग्याचा, वातव्याधी, श्री रामविश्वपंचायतन (मराठी), मंत्र जीवनाचा, चक्र सुदर्शन (मराठी), संतुलन क्रियायोग (मराठी), स्वास्थ्याचे 21 मंत्र. (भाग एकाहून अधिक.), स्त्रीआरोग्य, आयुर्वेद उवाच. भाग 1, 2.(मराठी).

Related Stories

समित्यांच्या अहवालानंतर ख्रिश्चन आणि मुस्लिम दलितांना अनुसुचित जातीचा दर्जा- मंत्री आठवले

Abhijeet Khandekar

सोलापुरात कोरोनाचे नवे 11 रुग्ण, तिघांचा बळी

Archana Banage

कोल्हापूर : गणी आजरेकरांनी बदनामीचा दावा करून दाखवावाच

Archana Banage

शैक्षणिक स्वायत्ततेसाठी थेट यूजीसीकडे अर्ज करता येणार

datta jadhav

पंतप्रधान मोदींकडून सेनेच्या सज्जतेची चाचपणी

Patil_p

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

Abhijeet Khandekar