आयुषमान खुराना नेहमीच वेगळय़ा विषयाच्या आणि भूमिकेच्या शोधात असतो, हे त्याने आजवर दाखवून दिले आहे. आयुषमानचा सिनेमा येणार म्हटल्यावर प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असते ती त्याने निवडलेल्या विषयाची. त्याने आतापर्यंत केलेले त्याचे सिनेमे पाहिले तर अगदी ’स्पम डोनर’च्या व्यक्तिरेखेपासून ते ’गे’ व्यक्तिरेखा साकारण्याचं धाडस करणारा तो बॉलीवूडमधला पहिलाच अभिनेता असावा. आयुषमान खुरानाचा सध्या ‘चंदिगढ करे आशिकी’ हा सिनेमा आपल्या भेटीस आलाय. या सिनेमात त्याच्यासोबत वाणी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आता आयुषमानचा सिनेमा आहे म्हटल्यावर कथानक हटके असणार, समाजमनाच्या एखाद्या विषयाचा मागोवा घेणारं असणार. ’चंदिगढ करे आशिकी’ सिनेमात वाणी कपूरनं ’ट्रान्सवूमन’ची व्यक्तिरेखा साकारली आहे. या निमित्तानं एका मुलाखतीत आयुषमाननं ’ट्रान्सजेंडर’ शब्द फार जवळचा आहे, असं म्हटलं आहे. त्यानं त्यासंदर्भात अनुभव मुलाखतीत शेअर केला. तो म्हणाला, ‘मी तेव्हा तेरा वर्षांचा होतो. जवळच्या हॉस्टेलमध्ये शिकणाऱया दोन मुली वडिलांकडे मदतीसाठी आल्या. त्यातल्या एकीला तिचं लिंग बदलण्याचं ऑपरेशन करायचं होतं. तिला पुरुष बनायचं होतं. कारण तिचं आकर्षण मुलींकडे आहे, हे कळले होते. आणि तिला त्या मैत्रिणीशी लग्न करायचं होतं. त्यासाठी तिनं ऑपरेशनचा पर्याय निवडला होता. त्यासाठी त्यांना मदत हवी होती. वडिलांनी तिला त्यांच्या ओळखीच्या स्त्राrरोगतज्ञाकडे पाठवलं. पण त्या डॉक्टरांनी त्या मुलीला ‘निसर्गाच्या विरोधात जाऊन काही करू नकोस’ असा सल्ला दिला. शेवटी वडिलांनी त्यांना मोठय़ा शहरात जाण्याचा सल्ला दिला. ती मुंबईत आली, तिनं ऑपरेशन करून घेतलं आणि नंतर मैत्रिणीशीच लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला जवळपास 25 वर्ष झाली आणि ते सुखाने संसार करत आहेत. त्यांचा त्रास मी अनुभवलाय. त्यामुळे अशा विषयावर काम करत असलेला सिनेमा आहे त्याचा आनंद आहे’’.
आयुषमान म्हणतो ट्रान्सजेंडरसोबत माझे जवळचे नाते
Advertisements