Tarun Bharat

‘आयुष्यमान भारत’ योजनेतील घोटाळा उघड

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ‘आयुष्यमान भारत’ योजनेत दोन लाखांपेक्षा अधिक बनावट कार्ड बनविल्याची बाब उघड झाली आहे. एका वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

सप्टेंबर 2018 मध्ये सुरू झालेल्या आयुष्यमान भारत योजनेतंर्गत गरिब रुग्णांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. आतापर्यंत 70 लाख लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याचा खर्च सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र, या योजनेत गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे.

उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड आणि झारखंडमधून अधिक बनावट कार्ड बनविण्यात आले आहेत. गुजरातमध्ये एकाच कुटुंबात तब्बल 1700 आयुष्यमान भारत कार्ड आढळून आले आहेत. तर छत्तीसगडमध्ये एका कुटुंबातील 57 जणांना या योजनेतून डोळय़ांची सर्जरी केल्याचे उघड झाले. पंजाबमध्ये दोन कुटुबांच्या नावावर 200 कार्ड बनविण्यात आले आहेत. तर मध्यप्रदेशात एका कुटुबांच्या नावावर 322 बनावट कार्ड छापण्यात आले आहेत. याप्रकरणी राजकोटमध्ये 6 जणांना अटक करण्यात आली आहे. 

Related Stories

दिल्ली : थिएटर्समध्ये सफाई आणि सॅनिटायझेशनचे काम सुरू

Rohan_P

अंकिता हत्या प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून दखल

Patil_p

देशात धार्मिक कट्टरता, उग्र राष्ट्रवादाची महामारी!

Patil_p

हेट स्पीचसंबंधी नाही स्पष्ट कायदा!

Patil_p

मुसेवालाच्या हत्येत पुण्यातील शार्पशुटर्स

Patil_p

57 कैद्यांची जामिनावर मुक्तता

Patil_p
error: Content is protected !!