Tarun Bharat

आयोडीनच्या सौम्य द्रावणाने कोरोना विषाणूचा नाश; शास्त्रज्ञांचा दावा

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

आयोडीनच्या सौम्य द्रावणाने तोंड आणि नाक स्वच्छ केल्यास कोरोना विषाणूंचा 15 सेकंदात नाश होतो, तेअसा निष्कर्ष ‘युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसिन’च्या शास्त्रज्ञांनी काढला आहे. 

या शास्त्रज्ञांनी एका अहवालात म्हटले आहे की, कोरोनाचा विषाणू मारण्यासाठी आम्ही एका प्रयोगात  0.5 टक्के प्रमाण असलेले आयोडीनचे द्रावण वापरले. या द्रावणाच्या वापराने कोरोना विषाणूंचा 15 सेकंदात नाश करण्यात यश आले.

माणसाने आयोडीनच्या सौम्य द्रावणाने तोंड आणि नाक स्वच्छ केल्यास कोरोना विषाणूचा नाश होईल. त्यामुळे विषाणू फुफ्फुसापर्यंत पोहचू शकणार नाहीत आणि रुग्णाची प्रकृती खालावणार नाही. त्यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना आयोडीनच्या वापराची पद्धत सांगावी, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

Related Stories

रमजान स्पेशल : जगातील सर्वात सुंदर अन् ऐतिहासिक मशिदी

Amit Kulkarni

1999 पासून बेपत्ता 8000 लोकांचा शोध घ्या

Patil_p

गेल्या आठ वर्षात नरेंद्र मोदींनी केवळ दोन व्यक्तींनाच मोठं केलं; राहुल गांधींचा घणाघात

Archana Banage

चिंताजनक : महाराष्ट्रातील सक्रिय रुग्ण संख्या 82,545 वर

Tousif Mujawar

रशियाकडून ब्रिटनला धमकी

Patil_p

नेल-पॉलिश लावल्यास बोटं कापू

Patil_p
error: Content is protected !!