Tarun Bharat

आय-लीगमध्ये चर्चिल-एजॉल बरोबरी; सुदेवा एफसीचा विजय

Advertisements

मडगाव : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत काल खेळविण्यात आलेला गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब आणि एजॉल एफसी यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला. कोलकातात या स्पर्धेतील सामने खेळविण्यात येत आहेत. या निकालाने दोन्ही संघांना समान एक गुण प्राप्त झाला. पहिल्या स्थानावर असलेल्या चर्चिल ब्रदर्स क्लबचे आता 6 सामन्यांतून 12 गुण झाले आहे. एजॉल एफसीचे पाच सामन्यांतून 8 गुण आहेत. विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात सुदेवा दिल्ली एफसीने चेन्नई सिटी एफसीचा 4-0 गोलानी पराभव केला. सुदेवा एफसीसाठी नाओचा सिंगने दोन तर नाओरेम सिंग व मानवीर सिंगने प्रत्येकी एक गोल केला. विजयाच्या तीन गुणांनी सुदेवा एफसीचे आता 6 सामन्यांतून 8 तर चेन्नईन सिटीचे पाच सामन्यांतून 6 गुण झाले. मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब आणि नॅरोका एफसी यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. मोहम्मेडचे आता पाच सामन्यांतून 7 तर नॅरोकाचे पाच सामन्यांतून 5 गुण झाले.

Related Stories

ख्रिश्चन समाजाला भाजपने येत्या निवडणुकीत 35 टक्के जागा द्याव्यात

Patil_p

नाणूस गोशाळेचे कार्य कौतुकास्पद : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

मुंबईचा पराभव; बेंगलोर 4-1 गोलानी विजयी, छेत्रीचे दोन गोल

Amit Kulkarni

कांदोळीतील 3 बेकायदेशीर स्पा जिल्हाधिकाऱयांच्या आदेशावरून सिल

Amit Kulkarni

करमल घाटात मालवाहू ट्रक कलंडला

Amit Kulkarni

डिचोली तालुक्मयातील 50824 मतदार ठरविणार 125 जणांचे भवितव्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!