मडगाव : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत काल झालेला गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब आणि ट्राव यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत संपला. कल्याणी म्युनिसीपल स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात चर्चिल ब्रदर्स क्लबच्या झुनिगाने 18व्या मिनिटाल गोल करून आघाडी घेतली होती. त्यानंतर 23व्या मिनिटाला ट्रावच्या बिद्यासागर सिंगने बरोबरीचा गोल केला. या निकालाने दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. चर्चिल ब्रदर्सचे आघाडीचे स्थान अजुनही कायम असून त्यांचे पाच सामन्यांतून 11 तर ट्रावचे पाच सामन्यांतून 7 गुण झाले आहेत. विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर खेळविण्यात आलेली पंजाब एफसी आणि सुदेवा दिल्ली यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत संपली. या दोन्ही संघांचे प्रत्येकी पाच सामन्यांतून समान पाच गुण झाले आहेत. सायंकाळी खेळविण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईनने इलवेडीनने 61व्या मिनिटाला केलेल्या गोलने इंडियन ऍरोजला पराभूत केले. चेन्नईनचे आता चार सामन्यांतून 6 तर ऍरोजचे पाच सामन्यांतून एक गुण झाला.


previous post