Tarun Bharat

आय-लीगमध्ये ट्राव एफसीचा विजय; मोहम्मेडन-पंजाब बरोबरीत

मडगाव : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत काल खेळविलेल्या ट्राव संघाने विजय नोंदविला तर ऍजोल एफसी व इंडियन ऍरोज आणि पंजाब एफसी व कोलकाताच्या मोहम्मेडन स्पोर्टिंग यांच्यातील लढती अनिर्णीत राहिल्या.

काल खेळविलेल्या पहिल्या सामन्यात ट्राव संघाने स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद करताना चेन्नई सिटीचा 2-0 गोलानी पराभव केला. विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर खेळविलेल्या या सामन्यात ट्रावसाठी पहिल्या गोलची नोंद एल्वेडीनने केलेल्या सॅल्फ गोलवर झाली. त्यानंतर बिद्यासागर सिंगने 69व्या मिनिटाला दुसरा गोल केला. या विजयाने ट्राव संघाला 3 गुण मिळाले. त्यांचे आता एक विजय व तीन बरोबरीने 6 गुण झाले आहेत. चेन्नई सिटी संघ 3 सामन्यांतून 3 गुण आहेत.

ऍजोल एफसी आणि इंडियन ऍरोज यांच्यातील लढत 1-1 असा बरोबरीत संपला. रिचर्ड कास्सागाने 12व्या मिनिटाला गोल नोंदवून ऍजोल संघाला आघाडीवर नेले तर इंज्युरी वेळेत इंडियन ऍरोजच्या सजाद हुसेनने बरोबरीचा गोल केला. या निकालाने ऍजोलचे 3 सामन्यांतून 4 तर ऍरोजचा 4 सामन्यांतून एक गुण झाला आहे. मोहम्मेडन स्पोर्टिंग आणि पंजाब एफसी यांच्यातील प्रकाशझोतात खेळविण्यात आलेली लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. या निकालाने उभय संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबचे आता 4 सामन्यांतून 6 तर पंजाब एफसीचे 4 गुण झाले आहेत. आज सामेवारी या स्पर्धेत दोन सामने खेळविण्यात येतील. गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्हस क्लबचा सामना सुदेवा दिल्ली एफसीशी तर नॅरोका एफसीची लढत गोकुळम केरळशी होईल.

Related Stories

मुरगाव बंदर ओस, केवळ अत्यावश्यक माल हाताळणी, वास्को शहरातही अवकळा, 40 कोटीच्या नुकसानीचा अंदाज

Omkar B

गोव्यात नांदतोय आनंदी आनंद!

Amit Kulkarni

अखेर मोपाचे डिसेंबरमध्ये ‘टेक ऑफ’

Amit Kulkarni

वीजेचा धक्का लागून युवा अभियंत्याचे निधन

Patil_p

सिद्धी स्वप्नील चोडणकरांचा कॅन्सर डॉक्टर होण्याचा मनोदय

Amit Kulkarni

सोणये – पालये तुयेत भरपावसात नळ कोरडे

Amit Kulkarni