Tarun Bharat

आय-लीगमध्ये मोहम्मेडन, ट्राव, ऐजॉल एफसीचे दमदार विजय

मडगाव : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत काल कोलकातात खेळविण्यात आलेल्या सामन्यात मोहम्मेडन स्पोर्टिंग, ट्राव आणि ऐजॉल एफसीने विजय नोंदविले. पहिल्या सामन्यात मोहम्मेडन स्पोर्टिंगने रियल काश्मीरचा दोन गोलांनी पराभव केला. पेद्रु मांझीने मोहम्मेडनचे दोन्ही गोल केले. आता मोहम्मेडनचे 10 सामन्यांतून 16 तर रियल काश्मीरचे 10 सामन्यांतून 17 गुण झाले आहेत.

ट्राव संघाने संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना सुदेवा दिल्ली एफसीचा 3-2 गोलांनी पराभव केला. विजयी संघासाठी बिद्यासागर सिंग, कौसाम फाल्गुनी सिंग व जोसेफ ओलालेईने तर पराभूत सुदेवासाठी विलियम पावलियानखूम व शुभा पॉलने गोल केले. विजयाने ट्रावचे आता 10 सामन्यांतून 16 तर सुदेवा दिल्लीचे 10 सामन्यांतून 9 गुण झाले आहेत.

तिसऱया सामन्यात ऐजॉल एफसीने सफाईदार विजयाची नोंद करताना चेन्नई सिटीचा 3-0 गोलांनी पराभव केला. ऐजॉल एफसीसाठी लालमुवानझुवा, माल्सवामतुलूंगा व लालरेमसांगा फनाय यांनी गोल केले. विजयाच्या तीन गुणांनी ऐजॉलचे आता 11 सामन्यांतून 18 तर चेन्नई सिटीचे 11 सामन्यांतून 9 गुण झाले
आहेत.

Related Stories

‘जिहाद’शी संबंध ठेवणाऱयांची गय नाही

Amit Kulkarni

‘चार्ली टेलर’ निघाला आरोपींचा अड्डा

Patil_p

कोकण मराठा सांस्कृतिक संघाचा वर्धापनदिन साजरा

Amit Kulkarni

5 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी फोंडा पालिकेकडून ‘ओटीएस’

Amit Kulkarni

आजपासून मासेमारीला प्रारंभ

Amit Kulkarni

राज्यातील 20 हजार उद्योगांना कर्ज मिळणार

Omkar B