Tarun Bharat

आरजीचे आणखिन सात उमेदवर जाहिर

प्रतिनिधी /पणजी

रिव्होल्यूशनरी गोवन पक्षाने (आरजी) चौथ्या यादीत आणखिन सात उमेदवार जाहिर केले असून राहिलेले उमेदवार येत्या शनिवार किंवा रविवारी जाहिर करण्यात येणार असल्याचे आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी सांगितले. येत्या विधानसभा निवडणूकीत चाळीसही जागा लढविणार असून आत्तापर्यंत चार यादीत 33 उमेदवार जाहिर केले आहेत. घरोघारी प्रचार दरम्यान आरजीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही  मनोज परब म्हणाले.

काल मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज परब बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत. आरजीचे विश्वेश नाईक व विरेश बोरकर उपस्थित होते. गोमंतकीय जनता पारंपारिक राजकारणाला कंटाळली असून त्यांना बदल हवा आहे. धर्म जाती, पैसा आणि दादगिरी याच्या मध्यमातून मते मिळवतात आणि सत्तेत आल्यावर मनमानी कारभार करीत असतात. या साऱया प्रकाराला गोव्यातील लोक विटले आहेत. आरजीने नवे तसेच जनतेची सेवा करणारे आणि तरुण उमेदवार निवडले असून मतदार त्यांच्या मागे राहतील यात शंकाच नाही असा विश्वासही मनोज परब यांनी व्यक्त केला आहे.

चौथ्या यादीत जाहिर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये शिवोली मतदार संघात गौरेश मांद्रेकर, फातोर्डा मतदार संघात व्हॅलीना फर्नांडिस, बाणावली मतदार संघात डॅजमंड फर्नांडिस, पर्ये मतदार संघात समिर सातार्डेकर, वास्को मतदार संघात आंद्रे व्हियेगस, दाबोळी मतदार संघात गौरीश बोरकर तर केपे मतदार संघात विशाल देसाई यांचा समावेश आहे. असेही मनोज परब यांनी सांगितले.

Related Stories

पणजी मार्केटात कांदा 20 ते 30 रुपयांनी स्वस्त

Omkar B

पिस्तुलातून चुकून सुटलेल्या गोळीने बालक गतप्राण

Amit Kulkarni

सेरेंडिपिटी कला महोत्सवात गाजली ‘लावणी’

Amit Kulkarni

…तर गोवा लवकर मुक्त झाला असता

Amit Kulkarni

पंतप्रधानांचा आज गोमंतकीयांशी संवाद

Amit Kulkarni

पणजीत 15 रोजीपासून सेरेंडिपिटी कला महोत्सवाचे आयोजन

Patil_p