Tarun Bharat

आरटीई प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ अद्याप सुरूच

प्रतिनिधी / सातारा : 

सातारा शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलभूत शिक्षणाचा हक्क यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शाळांनी लावलेल्या नियमावलीनुसार कागदपत्रांची जुळवाजुळव केली. मात्र, आरटीई प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ अद्याप सुरु असून, प्रशासनाने दि.25 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  

आरटीई निययानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालकांची सध्या पळापळ सुरु आहे. ऑनलाईन नोंदणी करुन प्रवेश मिळवण्यासाठी पालक प्रयत्नशील आहेत. शिक्षण विभागाकडून ज्या गाईडलाईन मिळतील, त्यानुसार सातारा शहरातील शाळांकडून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आरटीईचे अनुदान दिले नसल्याने प्रवेश देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यावर चर्चा होऊन अनुदान देण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याची समजते. काही शाळांच्या तांत्रिक बाबी होत्या. त्याही दुर करुन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. पालकांना ज्या अडचणी भेडसावत होत्या, त्या अनुषंगाने मार्गदर्शन केले जात आहे. 25 टक्के प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत, असे साताऱ्याच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी जयश्री शिंगाडे यांनी सांगितले.  

Related Stories

कार पलटी होवून चिमकुली ठार

Patil_p

काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार

Patil_p

खा.उदयनराजेंकडून जलमंदीर पॅलेसमध्ये शिवराज्याभिषेक

datta jadhav

रस्ता झाला नाय, रोप वे कसला करताय?

Patil_p

दुसाळेचा जवान लेहमध्ये हुतात्मा

Patil_p

हुतात्मा स्मारकासमोर टपऱयांमध्ये मटका बोकाळला

Patil_p