खासगी एजंटाला पकडले
प्रतिनिधी / कराड
कराड आरटीओ कार्यालयातील एजंटांची साखळी पुन्हा चर्चेत आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खासगी एजंटाला पकडल्याने खळबळ उडाली आहे. नवीन एक्टिवा फाईव्ह जी मोटरसायकल पासिंग करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
राजू जाधव असे कारवाई झालेल्या खासगी एजंटांचे नाव असल्याचे सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.