Tarun Bharat

आरटीओ मैदानानजीक ‘बर्निंग कार’

ऑटोनगर येथे शॉर्टसर्किटमुळे इंजिन पेटल्याने घडली दुर्घटना, सुदैवाने अनर्थ टळला

प्रतिनिधी /बेळगाव

इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन धावत्या कारला आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली आहे. प्रसंगावधान राखून कारमालक व त्यांचा मित्र यांनी दरवाजा उघडून बाहेर उडी घेतल्याने केवळ सुदैवाने मोठा अनर्थ टळला. रविवारी सकाळी ऑटोनगर येथील आरटीओ मैदानाजवळ ही घटना घडली आहे.

अंजनेयनगर येथील अशोक बिरादार हे आपल्या मित्राला घेऊन हिंडाल्कोमार्गे एपीएमसीकडे निघाले होते. केए 22 एमए 2147 क्रमांकाच्या आय-20 कारमधून हे दोघे निघाले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास इंजिनमधून आवाज व धूर येऊ लागला आणि थोडय़ाच वेळात कारने पेट घेतला. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, बंब दाखल होईपर्यंत  संपूर्ण कार जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत कारचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता.

घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. काही आस्थापनात पिण्यासाठी ठेवलेले पाणी आग विझविण्यासाठी वापरण्यात आले. मात्र, आग आटोक्मयात आली नाही. ‘मोठा आवाज येऊन धुराचा लोळ उठताच आपल्याला भीती वाटली म्हणून आपण आणि आपला मित्र दोघांनी गाडी बंद करून दरवाजा उघडून बाहेर पडलो’, असे अशोक यांनी सांगितले.

Related Stories

घरगुती कचऱयापासून गार्डनकरिता सेंद्रिय खत निर्मिती करा

Omkar B

राजधानीचा विमानप्रवास सुसाट

Amit Kulkarni

पीएम किसान सन्मान निधी ई-केवायसीसाठी 22 मेपर्यंत मुदत

Amit Kulkarni

कार्यकर्त्यांची सुटका करणाऱ्या अॅड.बिर्जे यांचा सत्कार

Patil_p

चेंबर ऑफ कॉमर्समध्ये कै.रावसाहेब गोगटेंच्या प्रतिमेचे अनावरण

Patil_p

करंबळ येथे ट्री-पार्कचे शानदार उद्घाटन

Amit Kulkarni