Tarun Bharat

आरटीपीसीआरची सक्ती नागरिकांसाठी तापदायक

Advertisements

बेळगाव  / प्रतिनिधी

कोरोना महामारीचा धोका वाढल्याने देशातील अनेक राज्यांतील सरकारांनी राज्यात प्रवेश करणाऱया नागरिकांसाठी आरटीपीसीआर (कोरोना निगेटिव्ह चाचणी) बंधनकारक केली आहे. यामुळे प्रवास करणाऱयांना चाचणीसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. बेळगावच्या शेजारी असणाऱया गोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी राज्यात प्रवेशासाठी आरटीपीसीआर बंधनकारक केले आहे. यामुळे प्रवास करणाऱयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

बेळगाव जिल्हय़ांच्या शेजारी असणाऱया महाराष्ट्र व गोव्यात दररोज शेकडो नागरिक प्रवास करतात. या दोन्ही राज्यांमध्ये बेळगावच्या नागरिकांची ये- जा असते. परंतु पहिला गोवा व नंतर महाराष्ट्र राज्याने राज्यात प्रवेश करताना 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. रस्ता, रेल्वे तसेच विमानमार्गे येणाऱया प्रवाशांना हा अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आरटीपीसीआर रिपोर्ट मिळविण्यासाठी नागरिकांनी धावपळ सुरू झाली आहे.

बेळगावमध्ये बिम्ससोबत काही निवडक ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चाचणी करून घेण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्यांना गरजेची कामे आहेत अशा व्यक्ती आरटीपीसीआर करून प्रवास करीत आहेत. नुकतेच नैर्त्रुत्य रेल्वेनेही एक पत्रक काढून महाराष्ट्रात जाणाऱयांना आरटीपीसीआर बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

राजेशकुमार मौर्य (संचालक, बेळगाव विमानतळ)

महाराष्ट्रात जाण्यासाठी प्रवाशांना आता आरटीपीसीआर बंधनकारक आहे. यामुळे यापूर्वी ज्यांनी तिकिटे बुकिंग केली आहेत. त्यांना विमान कंपन्यांकडून फोन करून आरटीपीसीआर करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.

Related Stories

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी मनपाकडून आवश्यक उपाययोजना

Patil_p

कृष्णाकाठी भक्तांची मांदियाळी

Patil_p

बेंगळूर: जलद प्रतिजैविक चाचणी अहवालांपैकी ९.४१ टक्के पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

गोकुळ युवक मंडळाची स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

अंगणवाडी पोषक आहाराला भ्रष्टाचाराची कीड

Omkar B

पावसामुळे हिरवी मिरची झाली लाल, बळीराजा बनला कंगाल

Amit Kulkarni
error: Content is protected !!