Tarun Bharat

आरटीपीसीआर नसणाऱया चौघांना अटक

कर्नाटकात प्रवेश करणाऱयांवर निपाणी ग्रामीण पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी /निपाणी

कर्नाटकात प्रवेश करणाऱयांना आरटीपीसीआर रिपोर्ट सक्तीचा करण्यात आला आहे. असे असतानाही रिपोर्ट सोबत न ठेवता कर्नाटकात प्रवेश करू पाहणाऱयांवर निपाणी ग्रामीण पोलिसांनी कारवाई करीत चौघांना अटक केली. याप्रकरणी 2 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत तर इतर 16 जणांची चौकशी करण्यात येत आहे.

मंगळवारी पहाटे 5 वाजता पोलिसांच्या गस्त पथकाला चुकवून मांगूर फाटा येथून महाराष्ट्रातील काहीजण 2 वाहनांतून आरटीपीसीआर रिपोर्ट नसताना कर्नाटकात प्रवेश करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयित वाहनांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली. यातील एका वाहनामध्ये 11 तर दुसऱया वाहनामध्ये 9 प्रवाशी होते. मात्र यापैकी एकाकडेही आरटीपीसीआर रिपोर्ट नव्हता. त्यामुळे सर्वांना पोलीस स्थानकात आणण्यात आले.

वरीलपैकी वामन गोविंद सोनकांबळे (वय 52, रा. लातूर), लहु शंकर लांडगे (वय 25, रा. लातूर), योगेश शिवाजी कोणे (वय 21, रा. हुबळी) व नितीन कृष्णात गोडय़ाप (वय 27, रा. कुर्ली, ता. निपाणी) या चौघांना आयपीसी 420, 260, 270, 271, 352 नुसार अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली.

Related Stories

बडाल अंकलगीची पुनरावृत्ती टळली

Amit Kulkarni

विश्वचषक विजेते रॉजर बिन्नी आज बेळगावात

Amit Kulkarni

जितो लेडिज विंगचा अधिकारग्रहण समारंभ

Patil_p

नावगे क्रिकेट स्पर्धेत गणेश स्पोर्ट्स विजेता

Amit Kulkarni

‘परीक्षेला हवे तर बसा नाही तर सोडा’

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक-गौंडवाड येथील 13 अंगणवाडय़ांना शासनाकडून साहित्य वाटप

Amit Kulkarni