Tarun Bharat

आरटीपीसीआर सक्ती कायम

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : दसऱयानंतर घेणार निर्णय

वार्ताहर /कोगनोळी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील दूधगंगा नदी पुलावर असलेल्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बुधवारी सकाळपासून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान जिल्हाधिकाऱयांनी आरटीपीसीआर अहवाल सक्ती मागे घ्यावी, यासाठी शिफारस केली आहे. याबाबत अद्याप तपास नाका प्रशासनाला आदेश आलेले नाहीत. त्यामुळे आंतरराज्य वाहतूक करणाऱयांना आरटीपीसीआरशिवाय प्रवेश नसणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आरटीपीसीआर सक्तीबाबत दसऱयानंतरच निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रासह अन्य राज्यातून येणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीचीच करण्यात आली आहे. आरटीपीसीआर नसणाऱया प्रवाशांना परत पाठविण्यात येत आहे. कर्नाटकसह बाहेरगावच्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांना कोठून आलात?, कोठे जाणार आहात?, वाहनांमध्ये किती प्रवासी आहेत? याची नोंद करुन सोडण्यात येत आहे. आरटीपीसीआरची सक्ती मागे घेण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे. याबाबत तपास नाक्मयावरील अधिकारी पीएसआय प्रविण बिळगी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आरटीपीसीआर रिपोर्ट मागे घेतल्याचा कोणताही आदेश वरिष्ठांकडून अद्याप आपल्याला मिळालेला नाही. त्यामुळे या नाक्यावरील कामकाज पूर्ववत सुरु आहे‌. वरिष्ठांकडून आदेश आल्यास आरटीपीसीआर अहवाल सक्ती मागे घेण्यात येईल. या तपास नाक्यावर आरोग्य विभाग, आशा कार्यकर्त्या, शिक्षण विभाग यासह अन्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारीही या नाक्मयावर सेवा बजावत आहेत.

Related Stories

डिसेंबरमध्ये 34 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्मयता

Omkar B

खड्डेमय रस्त्यांमुळे जीव गमावण्याची वेळ : अपघाताची शक्यता

Amit Kulkarni

बेंगळूर हिंसाचार प्रकरणी नगरसेविका इर्शाद बेगम यांच्या पतीला अटक

Archana Banage

महापौर-उपमहापौर निवडणूक तातडीने घ्या

Amit Kulkarni

जितो बेळगावच्या अध्यक्षपदी सुनील कटारिया

Patil_p

कंग्राळी बुद्रुक साई मंदिरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण

Amit Kulkarni