Tarun Bharat

आरपीडी महाविद्यालयामध्ये महात्मा फुले जयंती साजरी

प्रतिनिधी / बेळगाव

एसकेई संस्थेच्या राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती रविवारी कॉलेजच्या पद्मश्री पु. ल. देशपांडे खुल्या रंगमंचावर साजरी करण्यात आली.

प्रास्ताविक व स्वागत प्रा. विजयकुमार पाटील यांनी करून महात्मा फुले यांच्या परिश्रमामुळे व सत्यशोधक ध्येयामुळे सर्वसामान्य व मुलींना शिक्षण मिळत असल्याचे सांगून प्रत्येकाने आपापल्यापरीने गोर-गरीब पीडित यांना मदत केली पाहिजे, असे सांगितले.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. राजाराम मोहन रॉय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजषी शाहू महाराज, महर्षि धोंडो केशव कर्वे अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या त्यागामुळे व शिक्षण प्रसारामुळे महिला व ग्रामीण भागातील अशिक्षित पुरुष शिक्षण घेत आहेत. महात्मा फुले, महात्मा गांधी, सावित्रीबाई यांचे प्रतिकृतज्ञ रहाणे, हे आपले कर्तव्य असल्याचे प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी सांगितले. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. विजयकुमार पाटील, शारीरिक शिक्षक एन. रामकृष्ण सोमशेखर, कुलकर्णी, गंगाधर देशपांडे व विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

विचित्र अपघातात आई-मुलगा ठार, दोघे जखमी

Amit Kulkarni

विवाह सोहळय़ावेळी दिला कर्तव्य निधी

Patil_p

थंडीत उबदार कपडय़ांना पसंती

Amit Kulkarni

कर्नाटक सरकार आजपासून करणार आंब्याची ऑनलाइन विक्री

Abhijeet Khandekar

रोटरीच्या वाईज रायडर प्रकल्पाचा शुभारंभ

Patil_p

पाईपलाईन रोडवरील सांडपाणी समस्येचे निवारण

Amit Kulkarni