Tarun Bharat

आरबीआयच्या निर्णयाने बाजारात उत्साह

Advertisements

सेन्सेक्स 460 अंकांनी वधारला : जागतिक पातळीवर सकारात्मक संकेत

वृत्तसंस्था /मुंबई

भारतीय रिझर्व्ह बँकेची मंगळवारपासून पतधोरण संदर्भातील बैठक सुरु होती. सदरच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती गुरुवारी सकाळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. यामध्ये रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात न आल्यामुळे त्याचे पडसाद गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात सकारात्मक पडल्याने सेन्सेक्समध्ये उत्साहाचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिवसभरातील कामगिरीमध्ये बीएसई सेन्सेक्स 460.06 अंकांनी मजबूत स्थिती प्राप्त करत निर्देशांक 58,926.03 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 142.05 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,605.85 वर बंद झाला आहे. गुरुवारी जागतिक पातळीवरील शेअर बाजारांमध्येही सकारात्मक कल राहिल्याने त्याचाही लाभ भारतीय बाजाराला झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्समधील मुख्य कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग 2.11 टक्क्यांनी वधारुन सर्वाधिक लाभात राहिले होते. याच्या व्यतिरिक्त इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभागही लाभात राहिले आहेत. बाजारात अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत. 

अन्य घडामोडींमध्ये आशियासह इतर बाजारात शांघाय, हाँगकाँग, सियोल आणि टोकीओ येथील बाजारात काहीशी तेजी राहिली होती. तसेच जागतिक पातळीवरील घडामोडींमध्येही सकारात्मक स्थिती राहिली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.08 टक्क्यांनी वधारले होते. दुसरीकडे विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीत सलगपणे विक्रीचा कल राहिला आहे. बुधवारी एफआयआयने 892.64 कोटी रुपये मूल्यांच्या समभागांची विक्री केली आहे.

पतधोरण बैठकीचा प्रभाव

भारतीय बाजारामध्ये आरबीआयकडून पतधोरण बैठकीत रेपोदर स्थिर ठेवल्याने त्याचे पडसाद सकारात्मक राहिले आहेत. कारण कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत मिळावी याकरीता हा निर्णय घेतल्याने सेन्सेक्स व निफ्टी तेजीत राहिल्याचे दिसून आले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 •  टाटा स्टील…… 1248
 •  इन्फोसिस……. 1768
 •  एचडीएफसी बँक 1524
 •  एचडीएफसी…. 2476
 •  कोटक महिंद्रा… 1862
 •  महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 853
 •  पॉवरग्रिड कॉर्प… 212
 •  एनटीपीसी…….. 136
 •  स्टेट बँक………… 540
 •  बजाज फिनसर्व्ह 16422
 •  आयटीसी………. 232
 •  टेक महिंद्रा…… 1466
 •  विप्रो……………. 573
 •  ऍक्सिस बँक……. 809
 •  एचसीएल टेक.. 1190
 •  सन फार्मा……… 892
 •  भारती एअरटेल.. 723
 • इंडसइंड बँक……. 971
 •  लार्सन ऍण्ड टुब्रो 1899
 •  बजाज फायनान्स 7140
 •  आयसीआयसीआय 805
 •  एशियन पेन्ट्स. 3237
 •  टीसीएस……… 3771
 •  हिंदुस्थान युनि. 2282
 •  टायटन……….. 2491
 •  अरोबिंदो फार्मा.. 684
 •  एसबीआय लाईफ 1146
 •  जेएसडब्लू स्टील. 672

समभाग घसरलेल्या कंपन्या

 •  मारुती सुझुकी.. 8804
 •  अल्ट्राटेक सिमेंट 7471
 •  नेस्ले…………. 18058
 •  रिलायन्स इंडस्ट्रीज 2379
 •  पेज इंडस्ट्रीज.. 40775
 •  बीपीसीएल……. 369
 •  डाबर इंडिया….. 564
 •  अशोक लेलँड…… 136
 •  गेल……………… 119
 •  मॅरिको………….. 508
 •  पीआय इंडस्ट्रीज 2623
 • कोलगेट……….. 1456
 • कोल इंडिया        167

Related Stories

जीएसटी करदात्यांना खुशखबरी

Patil_p

पहिल्याच दिवशी सेन्सेक्स, निफ्टीची नवी झेप

Patil_p

SBI चे गृहकर्ज महागले

datta jadhav

ऍक्सिस बँकेकडून कॉन्टॅक्टलेस पेमेन्ट उपकरण

Patil_p

गोपाला पॉलिप्लास्टची झेप

Patil_p

‘बजाज’ने 75 शहरांमध्ये सुरु केली चेतकची विक्री

Patil_p
error: Content is protected !!