Tarun Bharat

आरबीआय निर्णयामुळे सेन्सेक्स नव्या उंचीवर

सेन्सेक्सची झेप पुन्हा 60,000 वर – निफ्टीही उच्चांकावर

वृत्तसंस्था/ मुंबई 

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी पतधोरण बैठकीमधील व्याजरासह अन्य निर्णय कायम ठेवण्याच्या घोषणेमुळे सप्ताहाच्या अंतिम दिवशी सेन्सेक्सने नवी उंची प्राप्त केली आहे. यामध्ये सेन्सेक्स 381 अंकांच्या मजबुतीसोबत नवा 60,000चा टप्पा प्राप्त केला आहे. यामध्ये निफ्टीनेही नवी झेप नेंदवली असल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 381.23 अंकांसह 0.64 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 60,059.06 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 104.85 अंकांनी वधारुन 0.59 टक्क्यांची स्थिती प्राप्त करत निर्देशांक 17,895.20 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक 3.84 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टीसीएस, टाटा स्टील आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग वधारले आहेत. दुसऱया बाजूला हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, मारुती सुझुकी, डॉ.रेड्डीज लॅब आणि टायटन यांचे समभाग मात्र 1.16 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.

व्याजदराची धास्ती

आरबीआय रेपो व रिर्व्हस रेपोदरा संदर्भात कोणता निर्णय घेणार या काळजीमुळे शुक्रवारच्या सत्रात बँकिंगसह वाहन कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिले असून वाहन कंपन्यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत. 

आठवडय़ाच्या आधारे सेन्सेक्स 1,293.48 अंकांसह 2.20 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. तर निफ्टी 363.15 अंकांच्या तेजीने 2.07 टक्क्यांनी लाभात राहिले आहेत.

आरबीआयचा कल

आरबीआयने द्विमासिक पतधोरण बैठकीच्या संदर्भात अनुकूल स्थिती राहिली आहे. यामध्ये केंद्रीय बँकेने महामारीच्या दरम्यान दिलेल्या प्रोत्साह याजनांचे पुन्हा संकेत दिले आहेत. सहा सदस्यीय पतधोरण समितीने रेपोदरात चार टक्क्यांनी आणि रिव्हर्स रेपोदरात 3.35 टक्के दर कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे दिवसभरात बाजारात उत्साहाचे वातावण राहिल्याचे दिसून आले. यामध्ये आयटी निर्देशांकांने नफा कमाई केली आहे.

दुसऱया बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही सकारात्मक कल राहिला होता. याचा फायदा हा देशातील भांडवली बाजाराला झाल्याचे पहावयास मिळाले आहे. अन्य आशियाई बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेंग तसेच जपानचा निक्की हा लाभात राहिला आहे.

Related Stories

‘थार’ वाहनाला उत्तम प्रतिसाद

Omkar B

बर्गर किंगचा लवकरच आयपीओ

Patil_p

5 जी सेवेमुळे देशात इंटरनेटचा वेग वाढला

Patil_p

चीपच्या टंचाईमुळे बजाज ऑटोच्या निर्यातीवर परिणाम

Patil_p

दूग्धोत्पादनांच्या निर्यातीवर परिणाम

Patil_p

‘एसबीआय’ची आरोग्यम हेल्थकेअर योजना सादर

Amit Kulkarni