Tarun Bharat

आरव गुप्ता ‘यंग जीऑग्रॉफर’ म्हणून सन्मानित

Advertisements

बेळगाव : लंडन येथील ‘जीऑग्रॉफी ज्युनिअर स्कूल डिपार्टमेंट’तर्फे दिल्या जाणाऱया 2021 च्या ‘यंग जीऑग्राफर’ या अभिमानास्पद पुरस्कारासाठी आरव अमित गुप्ता याची निवड झाली आहे. बेळगावच्या जाई नाडकर्णी यांचा तो मुलगा आहे.

आरव लंडनमधील किंग्ज कॉलेज ज्युनिअर स्कूलचा विद्यार्थी आहे. अकराव्या वषी त्याने हा पुरस्कार मिळविला असून आजपर्यंतच्या पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये तो सर्वाधिक लहान वयाचा विद्यार्थी आहे.

2021 साली ‘कोविड-19’ संसर्गाचा दैनंदिन मानसिक व सामाजिक व्यवस्थेवरील प्रभाव मी व माझे कुटुंब यांचा लॉकडाऊनमुळे परिसरातील कोणत्या जवळच्या विभागाशी तुमचे नाते जडले, असा विषय स्पर्धा आयोजक संस्थेने दिला होता. त्यावर चित्रमय, भौगोलिक नकाशा काढुन त्याचे वर्णन करावयाचे होते. आरवने काढलेले चित्र नकाशा आणि त्यावरील त्याचा अनुभव शब्दबध्द करुन पाठविला होता. यासाठी ‘यंग जिऑग्राफर म्हणून त्याची निवड करण्यात आली.

कोविडचा प्रभाव कमी झाल्यानंतर रॉयल जिऑग्राफीक सोसायटीतर्फे सेंट्रल लंडन येथे मान्यवरांच्या हस्ते एका विशेष सोहळय़ात आरवचा सत्कार करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे मेरेटॉन एरियातील कौन्सिलर व मेंबर ऑफ पार्लमेंट यांच्या सोबत भविष्यातील ‘अकोप्रेंडली प्लॅनिंग’साठी त्याला सहभागी करुन घेण्यात येणार आहे. आरव हा बिंबा व किशोर नाडकर्णी यांचा नातू होय.

Related Stories

सकाळी गर्दी… दिवसभर शांतता

Patil_p

बेळगाव येथे अधिवेशन नको

Amit Kulkarni

प्लास्टिक बंदीसाठी हा करतो पायी यात्रा

Amit Kulkarni

यल्लम्मा मंदिरात पूजा करण्यास परवानगी द्या

Omkar B

गरीब-गरजू वकिलांना बार असोसिएशनची मदत

Patil_p

रसिक रंजनतर्फे आज ‘पहाडी’ संगीत कार्यक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!