Tarun Bharat

आरास साहित्याची 70 टक्के आयात ठप्प

कोल्हापूर / संग्राम काटकर

गणेशोत्सव 14 दिवसांवर येऊनही कोल्हापूरी बाजारपेठेतील होलसेल व रिटेल दुकानदारांनी 5 राज्यांमधून 70 टक्के नवीन आरासीचे साहित्य आयातच केलेले नाही. गतवर्षी महापुरामुळे मंडळांसह घरगुती गणेशभक्तांनी गणेशोत्सव साधेपणाने करुन आरासीला महत्व दिले नाही. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आरास साहित्य खपलेच नव्हते. सध्याच्या कोरोनाच्या काळातही असेच घडले तर नुकसान होईल याची भीती असल्याने हेलसेल, रिटेलर्सनी आरास साहित्य आयातीत हात अखडते घेतले आहेत. त्यामुळे भक्तांना बाजारपेठेत मिळणाऱया थोडय़ाबहूत व घरातील उपलब्ध साहित्यानेच गणेशमूर्तीभोवतीने यंदा आरास करावी लागणार आहे.    

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तन-मन-धन लावून गणेशोत्सव साजरा करणारे हेच गणेशभक्त गणेशमूर्तीभोवतीने कोणती आरास करायची, त्यासाठी कसल्या प्रकारचे आरासीचे साहित्य असावे, याच्या नियोजनात मग्न होतात. उत्सवात हमखास मागणी येत असल्याने होलसेल व रिटेल दुकानदार मुंबई, बेंगळूर, सुरत, दिल्ली, चेन्नई, कोलकाता येथून कोटय़वधी रुपयांचे नवनवीन आरास साहित्य आयात करत असतात. उत्सव 10 दिवसांवर आला की गणेशभक्त त्याची खरेदी करतात. यंदा मात्र होलसेल व रिटेलर्सकडे फारसे नवीन आरास साहित्य दिसणार नाही. कोरोनाची वाढती गंभीरता पाहून अनेक गणेश मंडळांसह घरगुती गणेशभक्तांनी यंदाही साध्याच पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविल्याने आरास साहित्यांची ऑर्डर होलसेल व रिटेलर्संना दिलेल्या नाहीत. दरवर्षीचा गणेशोत्सव 2 महिन्यांवर आला की बाहेरील दुकानदार कोल्हापुरीतील होलसेलर्सना आरास साहित्यांची मोठी ऑर्डर देत असतात. यंदा मात्र त्यांनीही कोरोनामुळे ऑर्डर देण्याचे टाळले आहे. यामुळे नुकसान नको म्हणून होलसेलचे जिह्यातील प्रमुख केंद्र असलेल्या बाजारगेटमधील होलसेलर्ससह शहरातील अन्य होलसेलर्संनी 5 राज्यांमधून 70 टक्के आरास साहित्याची आयातच केलेली नाही. शिवाय ज्या होलसेलर्सनी 30 टक्के साहित्याची आयात केली त्यांच्याकडून शहरासह बाहेरील गावांमधील रिटेलर्स व स्टॉलधारकांना फारसे आरास साहित्य विक्रीसाठी मिळणार नाही. रिटेलर्संना साहित्यांचा पुरवठा करताना नेहमीच्या हजारो गणेशभक्तांसाठी ही थोडे आरास साहित्य होलसेलर्सना राखून ठेवावे लागणार आहेच. त्यामुळे होलसेल, रिटेलर्ससह शहरातील स्टॉलधारकांकडे जे काही थोडेबहूत आरास साहित्य उपलब्ध तेच गणेशभक्तांना खरेदी करावे लागणार आहे.

दरवर्षी सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, विजापूर, गोवा येथील शेकडो दुकानदार दरवर्षी कोल्हापुरातील होलसेलर्सकडे मोठय़ा प्रमाणात आरास साहित्यांच्या ऑर्डरी देत असतात. यंदा मात्र कोरोनामुळे त्यांनी ऑर्डर दिलेल्या नाहीत. गणेशभक्तांनी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविल्याने त्यांनी
ऑर्डर दिलेल्या नाहीत त्यामुळे होलसेल-रिटेलर्संना साहित्याची आयात फार कमी करावी लागली आहे.  – सचिन शहा (होलसेल आरास विक्रेते)

Related Stories

जातनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधान मोदी तयार होतील – नवाब मलिक

Archana Banage

लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात प्रबळ विरोधकांची गरज

Patil_p

पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर

Patil_p

सोळांकूर येथे वीज बिल वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हातात तलवार घेत दिली धमकी

Abhijeet Khandekar

इस्पुर्ली येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान

Abhijeet Khandekar

तीस कृषी सेवा केंद्रांना खत विक्रीस बंदी

Archana Banage