Tarun Bharat

आरेत दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

ऑनलाईन टीम / मुंबई :

आरेत धूमाकूळ घालणारा बिबट्या अखेर आज पहाटे वनविभागाने जेरबंद केला. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने आरे युनिट नंबर 3 मध्ये गुरुवारी पिंजरा लावला. रात्रभर जागता पाहरा ठेवण्यात आला होता. पहाटे तीनच्या सुमारास हा बिबटय़ा वनविभागाने लावलेल्या पिंजऱयात अडकला. वनविभागाने यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.

आरेमध्ये मागील महिनाभरापासून बिबट्याने दहशत माजवली होती. या बिबटय़ाने 5 जणांवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. दोन दिवसांपूर्वीच बिबट्याचे पिल्लू वनविभागाला सापडले होते. आज पहाटे बिबट्याही जेरबंद झाला. त्या बिबट्याची आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आरेत दहशत माजवणारा हाच तो बिबट्या आहे का, याची शहानिशा होईल.

Related Stories

ठाणे महापालिका आणि मेडिकल असो.च्या उपक्रमास नागरिकांनचा प्रतिसाद

Archana Banage

बंडखोर सत्यजीत तांबेंना पाठिंबा नाही…ही भाजपची खेळी- नाना पटोले

Abhijeet Khandekar

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी

Tousif Mujawar

छोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्पचं नवं पर्व

Archana Banage

मुख्यमंत्र्यांची चार वाजता बैठक ; मुंबईतील कोरोना स्थितीचा घेणार आढावा

Archana Banage

उपमुख्यमंत्र्यांकडून माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!

Tousif Mujawar