Tarun Bharat

आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलूही कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/ बेंगळूर

एकापाठोपाठ अनेक राजकारण्यांना कोरोनाचा विळखा बसत असताना त्यात आता आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना संसर्ग झाला होता. कोरोनाची बाधा झाल्याचे मंत्री श्रीरामुलू यांनी स्वतः टविट्रद्वारे ही माहिती दिली आहे. बेंगळूरच्या शिवाजीनगर येथील बोरींग सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताप आल्याने रविवारी आपण कोरोना चाचणी केली असता आपला अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे त्यांनी कळविले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली आरोग्य खात्याने जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्ध लढा देत असल्याचेही ते म्हणाले.

आमदार शामनूर शिवशंकरप्पा कोरोना पॉझिटिव्ह

ज्येष्ठ काँग्रेस नेते व दावणगेरे दक्षिणचे आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी त्यांनी कोरोना चाचणी केली होती. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा त्यांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार शामनूर शिवशंकरप्पा यांनी शनिवारी रात्रीच बेंगळुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू केला आहे. माझी तब्येत चांगली असून कोणीही काळजी करण्याची गरज नाही, असे त्यांनी कळविले आहे. केवळ आपला अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, कोणतीही लक्षणे नाहीत. तीन-चार दिवसात बरा होईन. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भीती बाळगू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Stories

मध्यप्रदेशात उद्यापासून धार्मिक स्वातंत्र्य विधेयकाची अंमलबजावणी

datta jadhav

महिन्याभरात मिळणार आणखी 17 राफेल

Patil_p

मूल्यांकन परीक्षा निर्णयाला आव्हान

Patil_p

डिझेलच्या घाऊक खरेदीदारांसाठी मोठी दरवाढ

Omkar B

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

datta jadhav

बिहारमध्ये पुन्हा विषारी दारूकांड

Patil_p
error: Content is protected !!