Tarun Bharat

आरोग्यमंत्री म्हणतात, रत्नागिरीत जिल्हय़ात डेल्टा प्लसचे 9 रुग्ण

प्रतिनिधी/  रत्नागिरी

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रत्नागिरी जिह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 9 रुग्ण सापडल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. असे असतानाही रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन रत्नागिरी जिह्यात एकही डेल्टा प्लस व्हेरियंट रुग्ण नसल्याचे ठामपणे सांगितले होते. या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे जिल्हावासीय मात्र द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन एका दमात जिल्हय़ात एकही डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण सापडलेला नाही, असा खुलासा केला होता. अशा प्रकारचे चुकीचे वृत्त छापून माध्यमांनी लोकांच्यात गैरसमज व भीती पसरवू नये, असे सांगून माध्यमांवर खापर फोडले होते. तसेच या विषाणूला कोणतेही नाव ठेवण्याचा प्रयत्न करू नये, असेही सांगितले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांचा रोख माध्यमांवर होता. अशी वृत्त कुठून आली, याची माहिती घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर झालेल्या मंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेत जिह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा एकही रुग्ण नसल्याचे  स्पष्ट केले होते. तसे राज्याच्या आरोग्य विभागाच्या फोर्सचे प्रमुख डॉ. तात्यासाहेब लहाने यांनीही तसे स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले होते. तरीही शक्यता लक्षात घेऊन दक्षता म्हणून त्या भागात प्रतिबंध क्षेत्र निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले, मात्र वस्तुस्थिती काहीही असेल तर ती माहिती माध्यमांपर्यंत देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱयांची आहे. त्यांनी वरिष्ठांशी बोलून योग्य ती माहिती दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले होते.

 दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटच्या 21 केसेस सापडल्या असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्हय़ात 9 केसेस सापडल्याचे स्पष्ट केले आहे. राजेश टोपे यांनी अधिकृत माहिती देऊन डेल्टाबाबत दुजोरा दिला असतानाही रत्नागिरीचे जिल्हाधिकारी या बाबत का संभ्रम निर्माण करत आहेत, वस्तूस्थिती का सांगत नाहीत, असा सवाल आता सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.या सर्वांमुळे जिह्यातील जनतेला आरोग्यमंत्र्यांचे ऐकायचे की जिल्हाधिकाऱयांचे, असा प्रश्न पडला आहे.

काळजी करण्याचे कारण नाहीः जिल्हा आरोग्य विभाग

जिल्हय़ात मागील 3 महिन्यांत wgsचे सॅम्पल दिल्ली लॅबला पाठवण्यात आले होते. त्यात न्ध्ण् न्न्ARघ्Aऱऊ ध्इ ण्ध्ऱण्Rिंऱ,/न्न्ARघ्Aऱऊ ध्इ घ्ऱऊRSिंऊ चे म्हणून निदान झाले. पण याचा परिणाम सकारात्मक अथवा नकारात्मक होईल, हे अजून सांगता येत नाही. wgs अ हे भारतातील 10 लॅबमध्ये केले जाते. राज्यस्तरावरील आयडीएसपी युनिटकडून जिल्हास्तरावर काही सूचना करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनी स्पष्ट केले. संगमेश्वर तालुक्यातील 5 गावांमध्ये माभळे, धामणी, कसबा, नावडी व कोंडगाव येथे एप्रिल ते जून 2021 मध्ये एकूण 6106 चाचण्या झाल्या. त्यापैकी 519 लोक पॉझिटिव्ह आले आहेत. संगमेश्वरातील 5 गावांमध्ये एकूण लोकसंख्येपैकी 49.51 टक्के लोकांच्या तपासण्या झाल्या. आरोग्य विभागाकडून सर्व गोष्टींची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सध्यस्थितीत काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. या पत्रकात डेल्टाचा एकदाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका अद्यापही स्पष्ट होत नाही.. 

Related Stories

गांजा प्रकरणात नव्या कलमान्वये गुन्हा

NIKHIL_N

वायंगणीत पहिल्या विणीतील कासवाची 87 पिल्ले सागरी अधिवासात सोडली

Anuja Kudatarkar

साताडर्य़ात शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू

NIKHIL_N

राणेंना अटक करण्याचे महाराष्ट्र सरकारचे राजकीय षडयंत्र – स्मृती इराणी

Archana Banage

आंगणेवाडीतील सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या कामगिरीचे ‘आयजीं’ कडून कौतुक

Anuja Kudatarkar

देवरूखात दागिन्यांसाठी महिलेचा निर्घृण खून

Patil_p