Tarun Bharat

आरोग्य उपसंचालकांनी घेतला आढावा

Advertisements

नॉन कोविड कामाकडे दुर्लक्ष होत असल्यावरुन झाडाझडती

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनामुळे जिह्यातील ग्रामीण रुग्णालयामधून रुग्णांना इतर आजारावरील उपचारांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या आली होती. त्यांनी आरोग्याचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांना बैठका घेवून संबंधित रुग्णालयांना नॉन कोव्हिडचे काम चांगले करण्याच्या सुचना दिल्या. सातारा जिह्यातील आठ रुग्णालयाचा आढावा शनिवारी घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी काही रुग्णालयांची झाडाझडती घेतली.

 कोरोनामुळे सर्वसामान्य रुग्णांना इतर आजारावर उपचार घेत असताना स्पष्ट शब्दात रुग्णालयाकडूंन नकार दिला जातो. त्याबाबतच्या आरोग्य विभागाकडे आलेल्या तक्रारीवरुन व होत असलेल्या दुर्लक्षाववरुन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या सुचनेनुसार आरोग्य उपसंचालक डॉ. सजोग कदम यांनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह आढावा घेणाऱया रुणालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यामध्ये डॉ. संजोग कदम यांनी घेतलेल्या आढाव्यामध्ये सातारा जिह्याची 25 लाख 69 हजार378 एवढी लोकसंख्या गृहीत धरुन केवळ 34.66 टक्के एवढय़ाच लोकांची नोंदणी झालेली आहे. त्यात जावलीमध्ये 31.7 टक्के, कराड 33.05टक्के, खंडाळा 36.93 टक्के, खटाव 55.03 टक्के, कोरेगाव 34.52 टक्के, महाबळेश्वर 35.91 टक्के, माण 20.93 टक्के, पाटण 26.93 टक्के, फलटण 35.96 टक्के, सातारा तालुका 31.19 टक्के, वाई तालुका 40.23 टक्के आहे. किती नागरिकांची इतर आजाराची तपासणी केली?, त्यामध्ये रक्तदाब, मधुमेह, अंध, अपंग यांना किती उपचार दिले याची माहिती घेण्यात आली. त्यानुसार उपचार वाढवा, अशा सुचना देण्यात आल्या. कुठेही उपचारामध्ये ढिलाई देवून गैरसोय करु नका, असे सुनावले.

दि. 13 रोजी कराड येथे आढावा बैठक

तसेच दि. 13 रोजी कराड पंचायत समितीत उपजिल्हा रुग्णालय कराड, ग्रामीण रुग्णालय उंडाळे, ढेबेवाडी, पाटण, वडूज, कलेढोण, दहिवडी, गोंदवले, औंध या रुग्णालयांची बैठक होणार आहे. ही बैठक दिवसभर चालणार आहे.

Related Stories

जिल्हा पोलीस दलाकडून कारवाईचा धडाका सुरू

Patil_p

हळद शेतकऱयांची 20 लाखांची फसवणूक

Patil_p

राजवाडा परिसरात वडाप चालकास चोप

Patil_p

महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेसाठी प्रशासनाने शड्डू ठोकला

Patil_p

लोकनियुक्त नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा : अशोक मोने

Archana Banage

सातारा : शब-ए-मेराज व शब-ए-बारात उत्सव साधेपणाने साजरे करा

datta jadhav
error: Content is protected !!