Tarun Bharat

आरोग्य तपासणीच्या रागातून पोलीस पाटलाला धक्काबुक्की

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरानजीक असलेल्या नवा फणसोप येथे आरोग्य तपासणीची सूचना करण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटलाला स्थानिक रहिवाशांनी धक्काबुक्की केल़ी  ही घटना शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडल़ी या प्रकरणी शहर पोलिसात 20 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

शादाब अब्दुल मज्जीद मुकादम (37, ऱा जुना फणसोप रत्नागिरी) असे धक्काबुक्की करण्यात आलेल्या पोलीस पाटलाचे नाव आह़े  शहर पोलिसांनी या प्रकरणी मौसिन होडेकर, हमीद पावसकर, याकूब होडेकर, मकबुल दाऊद फणसोपकर, इम्रान अहमद सोलकर, गफूर पटेल, फैरोज होडेकर, इकबाल होडेकर व अन्य 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आह़े या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीवडा येथे कारोना रूग्ण आढळल्यानंतर लगतच्या परिसरात आरोग्य तपासणी करण्यात येत आह़े  त्यानुसार नवा फणसोपचे पोलीस पाटील हे शादाब मुकादम हे आरोग्य तपासणी करण्यासंबंधी सूचना करण्यासाठी नवा फणसोप येथे गेले होत़े  यावेळी उर्दू शाळेजवळ संशयित आरोपी यांनी एकत्र येवून शादाब यांना धक्काबुक्की केल़ी  तसेच आरोपी इम्रान सोलकर याने शादाब याला जवळच उभ्या असलेल्या सरपंचांच्या गाडीमध्यू ढकलून दिले, अशी तक्रार शादाब यांनी शहर पोलिसांत दाखल केल़ी 

या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींविरूद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत भादंवि कलम 353, 143, 147, 188, 269 नुसार गुन्हा दाखल केला आह़े या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सकपाळ करत आहेत़

Related Stories

रत्नागिरीत कामगारांचे सरकार जगावो आंदोलन

Patil_p

ओंकार.. ‘दी गाईड ऑफ कार्स!’

NIKHIL_N

‘पॉझिटिव्ह’ची संख्या 99 वरून 113 वर

NIKHIL_N

आरोग्य सेतूद्वारे ऑनलाईन औषध विक्रीला विरोध

Patil_p

भडगाव-खोंडेतील तरूणाची गळफासाने आत्महत्या

Patil_p

प्रवीण भोंसले यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!