Tarun Bharat

आरोग्य तरतुदीत ऐतिहासिक वाढ

नवी दिल्ली

 आरोग्य क्षेत्रासाठीच्या आर्थिक तरतुदीत 137 टक्के इतकी ऐतिहासिक वाढ सुचविणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. आरोग्यासमवेत पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी आणि उत्पादन क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्याचे दिसून येते.  पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभारात अनुक्रमे 4 रुपये आणि 2.5 रुपये वाढ करण्यात आली आहे. तथापि त्यांच्यावरील उत्पादन शुल्क कमी केल्याने नव्याने किंमत वाढण्याची शक्यता नाही. प्राप्तीकरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्यात आली आहे. कोरोना रोखण्यासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आत्मनिर्भर भारत योजनेलाही चालना दिल्याचे दिसत आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढल्यास सर्वसामान्यांची अडचण होणार आहे. एकंदरीत हा अर्थसंकल्पात विकासाला चालना देण्याचा आणि रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे जाणकारांचे मत आहे.

Related Stories

भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार ‘ध्रुवास्त्र’

datta jadhav

देशातील पहिला सेन्सरवर वाहतूक चालणारा इंटेलिजंट रोड

Abhijeet Khandekar

LPG सिलिंडर 265 रुपयांनी महागला

datta jadhav

रिव्हर्स रेपो आणि रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही : शक्तिकांत दास

Tousif Mujawar

By polls Results : उत्तर प्रदेशात भाजपचा विजय; तर दिल्लीमध्ये ‘आप’ विजयी

Archana Banage

सोने तस्करी प्रकरणी अधिकारी ताब्यात

Omkar B
error: Content is protected !!