मुंबई \ ऑनलाईन टीम
ठाण्यातील वेदांत रुग्णालयात आज ऑक्सिजन अभावी चार जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. यांनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तत्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
किरीट सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले की, रोज राज्यात रुग्णालयात कधी आगीमुळे तर कधी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतोय. मात्र आरोग्य मंत्री फक्त भाषण करत फिरतात, इतक्या घटना घडत असताना आरोग्य मंत्र्यांची हकलापट्टी का केली जात नाही? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच तत्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ठाण्यातील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील खाजगी वेदांता रुग्णालयातील हा प्रकार मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे यांनी उघडकीस आणला. त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतली . याप्रकरणाची चौकशी सहा सदस्यीय समितीकडून केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एवढंच नाहीतर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनीही सकाळी वेदांता रुग्णालयाला भेट दिली. तसेच या घटनेची शल्यचिकित्सकांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.


next post