Tarun Bharat

आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यास प्राधान्य द्या – राजेश क्षीरसागर

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासकीय, खासगी आरोग्य यंत्रणांनी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स बेड्स वाढवावीत, आरोग्य यंत्रणांनी फायर ऑडिट करावे. तसेच चिल्ड्रन व्हेंटिलेटर्स, शंभर टक्के लसीकरणाची सुनिश्चतता याद्वारे पूर्ण खबरदारी घ्या, असे निर्देश अतिरिक्त विभागीय आयुक्त संजय धिवरे यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. नागपूर विभागीय कार्यालय अंतर्गत नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिह्यांची वार्षिक योजना, नावीन्यपूर्ण योजना आणि कोविडच्या निधी आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे पार पडली. यावेळी क्षीरसागर बोलत हेते.

कोल्हापूर जिल्ह्यात नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबवलेल्या ओपन जिमसारख्या उपक्रमाची दखल राज्याच्या अर्थसंकल्पीय पुस्तकात घेतली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्याच्या पर्यटन विकासाबाबत धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हा वार्षिकच्या नावीन्यपूर्ण येजनेतून ओपन जिम, मल्टिपर्पज क्रीडांगणे, ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण, तलावांचे सुशोभीकरण यासारखे उपक्रम राबवून जिह्यांच्या पर्यटन विकासास चालना द्यावी, अशा सूचना क्षीरसागर यांनी दिल्या. बैठकीस नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, वर्धाच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिना तसेच आदि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात 65 नवे रूग्ण, 42 कोरोनामुक्त

Archana Banage

गारगोटी -पिंपळगाव रस्त्यानजीक टस्कराचा धुडगूस

Archana Banage

सप्ताहभरात वेतनाची ग्वाही, आठ तासांनंतर कंत्राटी डॉक्टर कामावर

Archana Banage

लॉकडाऊन काळातील वीज बिले मागील बिलांप्रमाणे दुरुस्त करून द्या

Archana Banage

कोल्हापूच्या फौंड्री उद्योगाचे भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन

Archana Banage

कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्‍यातील ‘या’ शाळा अनधिकृतरित्या बंदच

Archana Banage