Tarun Bharat

आरोग्य यंत्रणेमार्फत लसीकरण सर्वेक्षण

आवश्यकतेनुसार लस देणार

प्रतिनिधी / ओरोस:

लसीकरणाचे नियोजन करूनदेखील काही गावांमधील लस शिल्लक राहत आहे. लसीकरणाच्या सुरुवातीच्या कालावधीत काही लोकांनी उपलब्ध होत असलेल्या ठिकाणी लसीकरण करून घेतल्याने प्रत्येक गावातील 18 वर्षावरील झालेल्या लोकांचे लसीकरण याची निश्चित माहिती घेणे आवश्यक आहे. म्हणूनच जिल्हय़ातील आरोग्य यंत्रणेमार्फत ग्रामपंचायतीच्या मदतीने गावनिहाय सर्वेक्षण करून झालेल्या लसीकरणाची माहिती संग्रहित करून उपलब्ध माहितीनुसार यापुढे आवश्यकतेनुसार गावांना लस पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली.

केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर लस पुरवठा होत आहे. प्राप्त लसीचे नियोजन आरोग्य यंत्रणेकडून होत आहे. परंतु गणेश चतुर्थी कालावधीनंतर लसीकरण करून घेण्यासाठी लोकांची संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेमार्फत गावनिहाय लसीकरण सर्वेक्षण केले जाणार आहे.

दरम्यान, वयोवृद्ध, दुर्धर आजाराने पीडित लोकांना लसीकरणासाठी येणे शक्मय नसल्याने त्यांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचनादेखील आरोग्य यंत्रणेला दिल्याचे संजना सावंत यांनी स्पष्ट केले.

Related Stories

देव तारी त्याला कोण मारी ; दरीत उडी घेणारी युवती सुखरूप

Anuja Kudatarkar

जिल्हय़ात आणखी सतरा पॉझिटिव्ह

NIKHIL_N

गाळ काढण्यासाठी आजपासून भिक मांगो आंदोलन

Patil_p

सप्टेंबरनंतर एप्रिल महिना दाहक; पण मृत्यू कमी

Patil_p

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष इर्शाद शेख

Anuja Kudatarkar

लाचप्रकरणी तत्कालीन भरणे ग्रामसेवकाचे निलंबन

Patil_p