Tarun Bharat

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी

प्रतिनिधी / कुरुंदवाड

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. शिरोळ तालुक्यामधील जनतेने शासनाने दिलेले आदेश प्रमाणित मानून सरकारला नेहमी साथ दिली आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह राज्याचे सर्व मंत्रिमंडळ पंतप्रधान व सर्व केंद्रीय मंत्री अनेक उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर्स आरोग्य सेवक व आरोग्य विभागाकडील कर्मचारी, पोलीस व महसूल विभागाकडील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कोरोना विरुद्धच्या या लढाईला सामोरे जात आहेत. शिरोळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सुरुवातीपासूनच या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. या संपूर्ण यंत्रणेला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे सुरुवातीपासून सहकार्य व मार्गदर्शन आहे.

राज्यभरासह कोल्हापूर जिल्हा व शिरोळ तालुक्यातील आरोग्यविषयक प्रत्येक घडामोडीवर मंत्री यड्रावकर लक्ष देऊन आहेत. याचाच भाग म्हणून त्यांनी आज शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी व कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन येथील डॉक्टर्स आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सूचना केल्या, यावेळी नरसिंहवाडी येथे दादेपाशा पटेल, अनंत धनवडे, सरपंच जयश्री हिरुगडे, उपसरपंच गुरुदास खोचरे बी. एन. टोने डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कवठेगुलंद येथील भेटीदरम्यान पंचायत समितीचे माजी सभापती मल्लाप्पा चौगुले यांच्यासह डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

थिबापॅलेस येथील जिजामाता उद्यानाचा रंगीबेरंगी साज

Patil_p

महाव्यवस्थापकांचा दौरा ‘बुलेट ट्रेन’पेक्षा फास्ट!

Archana Banage

वेंगुर्ले पोलीसांतर्फे ग्रामीण भागात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती

Anuja Kudatarkar

अफवांचे ‘राजकारण’ वेळीच थांबले पाहिजे!

NIKHIL_N

कोल्हापूर : सीपीआरच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची तात्काळ बदली

Archana Banage

गायब सदस्य परतले अन् सरपंच, उपसरपंचही बनले!

Patil_p