Tarun Bharat

आरोग्य विभागाच्या भरतीसंदर्भात ‘बनावट’ वेबसाईट

Advertisements

रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र’ असे नाव

प्रतिनिधी/ रत्नागिरी

सध्या आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात एक बनावट वेबसाईट बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र’ या नावाने बनावट (फेक) खात्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून राज्यभरातील हजारो तरूणांना गंडा घालण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे या फेक वेबसाईटवर उमेदवारांनी अर्ज न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे.

   ग्रामविकास मंत्रालयाकडून जिल्हा परिषद आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया 2019 साली घेण्यात आली. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. पण त्या पेजवर दिलेल्या रत्नागिरी जिल्हय़ातील रिक्त जागांची संख्या चुकीची आहे. रत्नागिरी जिह्यात 88 जागा रिक्त दाखवल्या आहेत. अन्य जिल्हय़ांचीही स्थिती तिच होती. प्रत्यक्षातील जागा वेगळ्याच असल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.

  मात्र 2019 च्या खऱया भरतीसंदर्भातील परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर झालेले असल्याचे त्यांनी सांगितले.  2019 मध्ये ज्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल केले होते, त्यांची लेखी परीक्षा येत्या 16 व 17 ऑक्टोबरला रत्नागिरीत होणार असल्याचे डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले आहे. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी 1, आरोग्य सेवक- पुरुष- 17, आरोग्य सेवक फवारणी (हंगामी) 46, एएनएम 126, औषध निर्माता 25 जागा रिक्त आहेत. मात्र या भरतीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या फेक वेबसाईटची राज्य शासनाने दखल घेतली असल्याचे सांगितले.

  राज्यात सायबर गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढलेले आहे. त्यामध्ये सरकारी यंत्रणेमार्फत होणाऱया भरत्या, अधिकाऱयांची फेसबुक अकाऊंट हॅक करणे त्याद्वारे पैसे लाटण्याचे प्रकार प्रकर्षाने समोर येत आहेत. सध्या आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात अशीच बनावट वेबसाईट बनवण्यात आल्याचे पुढे आले आहे. रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र’ या फेक खात्याचा वापर करण्यात आला आहे. अलिकडे शासकीय खात्यातील नोकर भरत्यांचे अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने, ऑनलाईन पैसेही भरुन घेण्यात येत आहेत. याचाच गैरफायदा घेऊन गंडा घालण्यासाठीचे प्रयत्न होऊ लागले असल्याचे सांगितले जात आहे.  

तर जिल्हा परिषद भरती परिक्षा पुढे ढकलण्याची शक्यता

आरोग्य विभागाकडून जिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी  26 सप्टेंबर रोजी आयोजित परीक्षा स्थगित झाली होती. त्या परीक्षेची तारीख अजून निश्चित झालेली नाही. मात्र ही परीक्षा व 2019 ची भरती परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असतील जिल्हा परिषदेच्या परीक्षा पुढे ढकलावी लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Related Stories

डाॅक्टर डे निमित्त रोटरीच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान

Anuja Kudatarkar

दुचाकींच्या धडकेत तिघे युवक ठार

NIKHIL_N

न.पं.च्या गणेशोत्सव नियमांची 17 ऑगस्टपासून अंमलबजावणी!

NIKHIL_N

रत्नागिरीतील लॉजमध्ये 5 लाखांचा ‘एमडी’ अमलीपदार्थ जप्त

Patil_p

आशा सेविका मानधन प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी

Patil_p

कंटेनर-दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार

Patil_p
error: Content is protected !!