Tarun Bharat

‘आरोग्य सेतू’ ऍप डाऊनलोड करा!

Advertisements

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून तसेच जनतेला कोविड-19 बाबत माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने ‘आरोग्य सेतू’ हे ऍप तयार केले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी हे ऍप अत्यंत उपयुक्त असून ते डाऊनलोड करणे महत्वाचे असल्याने जिल्हय़ातील जास्तीत जास्त नागरिकांनी हे ऍप डाऊनलोड करावे व कोरोना विरुद्धच्या या लढय़ामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

हे ऍप ब्लू टुथ तंत्रज्ञानावर आधारित असून ऍन्ड्रॉईड व आयओएस प्रणालीच्या भ्रमणध्वनीवर चालते. 11 भाषांमध्ये हे ऍप उपलब्ध आहे. याद्वारे कोविड-19 बाधीत रुग्णांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या माहितीच्या आधारे जी. पी. एस. तंत्रज्ञानाद्वारे कोरोना बाधित रुग्ण जवळपास असल्यास वापरकर्त्यास धोक्मयाची सूचना देते. कोविड-19 च्या स्व चाचणीची सुविधा, प्रतिबंधात्मक उपाययोजना, शारीरिक अंतर पाळणे व प्रतिबंधासाठी काय करावे व काय करू नये, याची माहिती वापरकर्त्याला मिळते. स्वचाचणीत वापरकर्ता अतिधोकादायक स्थितीत आढळल्यास या ऍपद्वारे जवळच्या कोरोना तपासणी केंद्राचा क्रमांक उपलब्ध करून दिला जातो किंवा तात्काळ 1075 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या जातात. वापरकर्त्याच्या सर्वसाधारण प्रश्नांची प्रमाणित उत्तरे दिली जातात. सर्व राज्यातील हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले जातात. लॉकडाऊन काळात वापरकर्त्यास अपरिहार्य परिस्थितीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱया ठिकामी जाण्याची आवश्यकता असल्यास ई-पास उपलब्ध होतो.

हे ऍप पुढील लिंकवर डाऊनलोड करून घेता येते. ios – itms-apps://itunes.apple.com/app/id505825357 व  Android : https:/play.google.com/store/appes/details?id= nic.goi.arogyasetu. थोडक्मयात आयओएस मोबाईलधारक त्यांच्या आयटय़ून्समधून व ऍन्ड्रॉईडधारक गुगल प्ले स्टोअरमधून हे ऍप डाऊनलोड करून घेऊ शकतात.

आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून वापरकर्त्यास धोक्मयाची सूचना, स्वमूल्यांकन चाचणी तसेच कोविड-19 पासून बचाव करण्याचे उपाय, शिक्षण मिळत असल्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधासाठी या ऍपचा वापर करणे महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने जिल्हय़ातील सर्व शासकीय व खासगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर ऍप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा. याकरिता संबंधित कार्यालय प्रमुख जबाबदार राहतील. परराज्यातून, परजिल्हय़ातून येणाऱया नागरिकांनी तपासणी नाक्मयाजवळच सदर ऍप डाऊनलोड करून घ्यावे. तपासणी पथक प्रमुखांनी संबंधितांना तशा सूचना द्याव्यात. कोविड-19 बाधित रुग्ण, अलगीकरण कक्षातील सर्व रुग्ण, संस्थात्मक विलगीकरण, गृह विलगीकरण करण्यात आलेले सर्व संशयित बाधित रुग्ण, रुग्णालयातील डिस्चार्ज मिळालेले बाधामुक्त नागरिक तसेच आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांनीही जनहितार्थ हे ऍप डाऊनलोड करून त्याचा वापर करण्याबाबतच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सर्व संबंधितांना द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.

Related Stories

केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांची आंबेगाव येथे सदिच्छा भेट

NIKHIL_N

शिवसेनेने एकसंघ होऊन काम करण्याची गरज- केसरकर

Ganeshprasad Gogate

पंडीत पंचगव्य गुरूकुलने बनविल्या शेणापासून पर्यावरण पूरक पणत्या

Patil_p

चाकरमान्यांसाठी दिले स्वतःचे रीकामे घर

Patil_p

युवा रक्तदाता संघटनेच्या दणक्यानंतर रक्तपेढीतील एसी यंत्रणा अखेर कार्यान्वित

NIKHIL_N

ट्रक चोरीतील दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या

NIKHIL_N
error: Content is protected !!