Tarun Bharat

आरोग्य सेतू ऍप सुरक्षितच

Advertisements

केंद्र सरकारचा दावा, 9 कोटी वापरकर्ते

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना व्हायरसच्या संसर्ग आणि प्रसारापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या हेतुने निर्माण करण्यात आलेले ऍप पूर्ण पणे सुरक्षित असल्याची खात्री केंद्र सरकारने दिली आहे. ऍपमध्ये देण्यात आलेला नागरिकांची माहितीही सुरक्षित असल्याचे ट्विटरवरुन सांगण्यात आले आहे. फ्रान्समधील सायबर सिक्युरिटी रिसर्चर इलियट अल्डरसन याने ट्विट करुन भारतीय आरोग्य सेतू ऍपच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

अल्डरसनच्या दाव्यानुसार या ऍपमध्ये बऱयाच त्रुटी आहेत आणि त्यामुळे डेटा लिक होण्याची समस्या उदभवू शकते. मात्र सध्यातरी 9 कोटी भारतीयांच्या माहितीची गोपनियता धोक्यात असल्याचे त्याने म्हटले आहे. याबाबत आपण मला वैयक्तिकरित्या संपर्क करु शकता, असेही त्याने म्हटले आहे.

तथापि केंद्र सरकारच्या आरोग्य सेतु विभागाने याबाबत विस्तृत माहितीवजा निवेदन प्रसिद्ध केले आहे. ऍपच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन एका हॅकरने आम्हाला सावधानतेबाबत सुचित केले आहे. याबाबत त्याच्याशी चर्चाही झाली आहे. कोणत्याही वापरकर्त्याची माहिती धोक्यात असल्याचे वाटत नाही.जवळपास 9 कोटी वापरकर्त्यांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. काहींसाठी हे ऍप अनिवार्य केले आहे. यामधून वापरकर्त्यांना त्यांच्या परिसरात कोणी कोरोना बाधित आहे काय याविषयी सुचित करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या ऍपबाबत आणि त्या सुरक्षितेबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. ऍप वापरकर्त्याच्या माहितीच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, समाज माध्यमांवर विविध ऍपबाबत माहिती दिली असून ते डाऊनलोड करण्याविषयी आवाहन केले जात आहे. मात्र यातील बनावट ऍपपासून सावध राहण्याविषयी केंद्र सरकारने इशारा दिला आहे. आरोग्य सेतू ऍप हे गुगल प्ले स्टोअर, ऍपल स्टोअर, मेरी सरकार अथवा माय गव्ह. या वेबसाईटवर उपलब्ध आहे. समाज माध्यमांवर आरोग्य सेतू ऍपची लिंक पाठवली असल्यास त्याचा वापर करु नये, कदाचित ती फिशींग लिंक असू शकते, त्यांना सपोर्टही करु नये, असे आवाहनही केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

व्याजदर कपातीचा निर्णय त्वरित मागे

Amit Kulkarni

काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

Patil_p

गंगा नदी काठावर ५ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

Abhijeet Shinde

मोदी नसते तर भारताची अवस्था अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगना राणावत

Abhijeet Shinde

ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टरमध्ये दाखल

Patil_p

संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करून दाखवा, एकनाथ शिंदेचा ठाकरे,राऊतांना इशारा

Rahul Gadkar
error: Content is protected !!