Tarun Bharat

आरोपीला 7 वर्षाची शिक्षा

सहकाऱयाचाच खून केल्याचा आरोप

प्रतिनिधी / मडगाव

वेर्णा येथील एकाच खोलीत राहात असलेल्या आपल्या सहकाऱयाचा खून केल्याचा आरोप असलेला मूळ झारखंड येथील आरोपी विनय केरकट्टा याला न्यायालयाने शुक्रवारी 7 वर्षाची शिक्षा ठोठावली.

दक्षिण गोव्याचे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने वरील आरोपीला साक्ष व पुरावे यावर आधारुन यापूर्वीच भारतीय दंड संहितेच्या 304 -अ कलमाखाली दोषी ठरविलेले होते. खुनाची ही घटना वेर्णा पोलीस स्थानकाच्या हृद्दीत घडली होती. या पोलिसांच्यावतीने  सरकारी वकील लेडिस्लाव्ह फर्नाडिस यांनी या खटल्याचे कामकाज चालविले होते. मात्र, निर्णयाच्यावेळी सरकारी व्ही. जे. कॉश्ता न्यायालयात उपस्थित होते. पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.

शिवाय 10 हजारांचा दंड

 झारखंड येथील आपलाच सहकारी रोशन उरोन (27) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन न्यायालयाने या कामगाराला दोन दिवसापूर्वी दोषी ठरविले होते. आरोपीला किती शिक्षा देण्यात यावी यावर 12 रोजी न्यायालयात युक्तीवाद झाल्यानंतर न्या. देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपीला 7 वर्षाची शिक्षा ठोठावताना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखी 6 महिन्यांची साधी कैद भोगावी असा या न्यायालयाने आदेश दिला.

या खटल्याच्यावेळी न्यायालयात एकूण 16 साक्षीदारांनी साक्ष दिली होती. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार मयत रोशन हा वेर्णा येथील एका भाडय़ाच्या खोलीत राहात होता. या खोलीत एकूण 7 कामगार राहात होते आणि एका बांधकामाच्या जागी काम करीत होते. खुनाची ही घटना जानेवारी 2018 मध्ये घडली होती. त्या दिवशी रोशन हा आपल्या खोलीत रक्ताच्या थारोळय़ात पडलेला आढळून आला होता.

बाजारात गेल्याचे पाहून खून

त्या दिवशी 7 पैकी 5 कामगार दुकानात सामान आणण्यासाठी बाजारात गेले होते तर रोशन हा आपल्या दुसरा सहकारी-विनय केरकट्टा याच्याबरोबर खोलीतच होता. बाजारातून हे कामगार खोलीत आले तेव्हा रोशन रक्ताच्या थारोळय़ात मृतावस्थेत पडलेला होता.

पोलीस तपासात रोशन व केरकट्टा यांच्यात सदोदीत वाद चालू होते अशी माहिती मिळाली. एव्हाना संशयित केरकट्टा फरारी झाला होता. पोलिसानी या आरोपीला मालीम जेटीजवळ अटक केली. रोशन उरोन याच्या खून प्रकरणी वेर्णा पोलिसानी आरोपी विनय केरकट्टा याच्याविरुद्ध न्यायालयात भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाली आरोपपत्र सादर केले. साक्ष व पुरावे यावर आधारुन न्यायालयाने आरोपी केरकट्टा याला खुनाच्या आरोपाखाली नव्हे तर रोशन उरोन याच्या मृत्यूसंबंधी भारतीय दंड संहितेच्या 304 अ कलमाखाली दोषी ठरविले.

Related Stories

फणस, नारळाला जिल्हा उत्पादने म्हणून मान्यता

Omkar B

चित्रपट निर्मात्यास समाज व राजकारण समजून घेणे महत्त्वाचे

Amit Kulkarni

आधार व युएएन एकमेकांशी संलग्न करा

Amit Kulkarni

स्वच्छता मोहीम यापुढे कचरा व्यवस्थापन सांमाळणार मायकल लोबो : सांळगाव प्रकल्पात लावणार 250 टन कचऱयाची विलेहवाट

Amit Kulkarni

राष्ट्रीय टेनिसबॉल सब-ज्युनियर क्रिकेट स्पर्धेत गोव्याला ब्राँझपदक

Amit Kulkarni

कुंकळ्ळी बंडाच्या इतिहासाचे विकृतीकरण त्वरित थांबवावे

Amit Kulkarni