Tarun Bharat

आर्थिक क्षेत्रांच्या बळकटीसाठी 9 लाख कोटीचे सहाय्य आवश्यक

विविध उपाययोजनांची गरजः कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचा सरकारला लाभ शक्मय

चालू आठवडय़ात तीन दिवसच शेअर बाजार सुरु राहणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

उद्योग संघटना असोचॅम यांनी कोरोनामुळे होत असणाऱया सर्व क्षेत्रांना बळकटी देण्यासाठी 100 ते 120 अब्ज डॉलर (7.50 ते 9 लाख कोटी रुपये) इतक्या पॅकेजची मागणी केली आहे. असोचॅमचे महासचिव दीपक सूद यांनी म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी करणे हा ठराविक उपाय असू शकतो. परंतु सरकारला आणखी उपयुक्त अशा विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.

कच्च्या तेलाचे दर खूप कमी झाल्याने देशाला 3.75 लाख कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचे सूद यांनी सांगितले आहे. यामुळे महागाईचा विळखा वाढण्याचा धोका नसून याचा लाभ सरकारलाही होणार असल्याचे म्हटले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे देशाला 50 अब्ज डॉलरचा (3.75 लाख कोटी रुपये) फायदा होणार असल्याचा अंदाज आहे.  सूद म्हणाले की, आरबीआयकडून विविध उपाययोजना केली जात आहे. याचा फायदा होईलच परंतु अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध करण्याची गरज आहे.

 सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा

गरीब, मजूर आणि शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी सरकारने 26 मार्च रोजी 1.70 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.

यामध्ये गरीबांना 5 किलो अतिरिक्त अन्नधान्य व एक किलो डाळ तीन महिन्यापर्यंत मोफत देण्याची घोषणा केली आहे. यासोबत महिलांच्या जनधन बँक खात्यात आगामी तीन महिने 500 रुपये जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लहान कंपन्यांमधील कर्मचाऱयांचा पीएफही तीन महिने सरकार भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरबीआयकडून व्याजदर कपात

सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केल्याच्या 27 मार्च रोजी आरबीआयने रेपोदरात 0.75 टक्क्मयांची कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कर्ज स्वस्त होणार आहे. यासह कर्जांचे हप्ते येत्या तीन महिन्यात वसूल करु नये अशा सूचनाही बँकांना केल्या आहेत.      

आगामी आठवडय़ात तीन दिवसच शेअर बाजार सुरु

मुंबई : आगामी आठवडय़ात देश विदेशातील कोरोनाची स्थिती नेमके कोणते वळण घेणार आहे ते निश्चित होणार आहे. सोमवारी महावीर जयंती असल्याने व शुक्रवारी गुडफ्रायडे असल्याच्या कारणास्तव बाजार बंद राहणार आहे. यामुळे एकूण तीनच दिवस शेअर बाजारात व्यवहार करण्यात येणार आहेत. या कारणामुळे बाजारात चढउताराचे सत्र राहण्याचे संकेत तज्ञांनी व्यक्त केले आहेत. कोरोनाचा वाढता विळखा आणि त्याचा फटका विविध देशांच्या अर्थव्यवस्थेला बसणार असल्याचे संकेत असून यात देशासोबत जागतिक पातळीवर होत असणाऱया कोरोनाच्या प्रभावाचा परिणाम शेअर बाजारातील व्यवहारांवर होण्याची भीती आहे.

मोतीलाल ओसवाल फायनाशिअल सर्व्हिसचे प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी म्हटले आहे, की बाजारात सर्वाधिक चढउतार राहण्याचा अंदाज मांडला आहे. दुसऱया बाजूला 2020-21 मध्ये भारताचा जीडीपी वृद्धीदर सर्वात कमी राहणार असून मागील 30 वर्षांचा नीचाक जीडीपी गाठण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर जागतिक विकासाचा दर 1.9 टक्क्मयांनी घसरण्याचे संकेत आहेत.

Related Stories

ऍपलमुळे भारतात 20 हजार जणांना मिळाला रोजगार

Patil_p

मोठय़ा कंपन्यांच्या प्रभावाने सेन्सेक्स घसरला

Patil_p

रोजगाराचे प्रमाण नोव्हेंबरमध्ये घटले

Patil_p

शेअर बाजारात दमदार तेजीचा धडाका

Patil_p

माहगाईचा उच्चांक

Omkar B

स्पाइसजेटचे समभाग घसरले

Amit Kulkarni