Tarun Bharat

आर्थिक वादातून पुलाची शिरोलीत युवकाचा खून

पुलाची शिरोली / प्रतिनिधी

पुलाची शिरोली ( ता. हातकणगले) येथील पंचगंगा नदीकाठावरील गवती पड नावाच्या शेतीलगत परप्रांतीय युवकाचा अज्ञातांनी खून केला. अमित रमेश राठोड (सध्या रा. माळवाडी, पुलाची शिरोली ) असे त्याचे नाव आहे. खूनाची ही घटना बुधवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हा खून आर्थिक वादातून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

पोलीस आणि घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की, मृत अमित राठोड हा गेल्या काही दिवसांपूर्वी आर्थिक विवंचनेत सापडला होता. त्यामुळे त्याने खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. या व्याजाच्या पैशांचा ठरलेला हप्ता त्याच्याकडून थकीत झाला होता. त्यामुळे थकीत हप्ता वसुल करण्यासाठी काही युवकांनी त्याच्याशी बुधवारी संपर्क साधून वसुलीकरीता येत असल्याचे सांगितले. त्यावरुन हप्ता वसुल करण्यासाठी आलेल्या युवकांची आणि अमितची गावातील झेंडा चौकात भेट झाली. त्या ठिकाणी त्याची आणि पैसे वसुलीसाठी आलेल्या युवकाच्या बरोबर शाब्दीक वाद झाला. या वादातून चिडून जावून चौकात अमितला बेदम मारहाण करण्यात आली.

या घडल्या घटनेनंतर मृत अमित गावालगतच्या पंचगंगा नदीकाठावरील दर्गानजीकच्या गवती पड नावाच्या शेतीलगत नशापार्टी करण्यासाठी काही युवकांच्या बरोबर मोपेडवरुन गेला. त्या ठिकाणी नशा पार्टी करीत असता त्यांच्यावर अनोळखी युवकांनी चाकू सारख्या हत्याराने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अमित जागीच ठार झाला. तो ठार होताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून त्वरीत पलायन केले. या घटनेची माहिती समजताच पुलाची शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठविला. यावेळी पोलिसांना घटनास्थळी गांजाच्या पुड्या, पाण्याच्या बाटल्या बरोबर रक्ताने माखलेली एक मोपेड मिळून आली असून, त्या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या. घटनास्थळी मिळालेल्या गांजाच्या पुडीवरून या ठिकाणी गांजा पार्टी आयोजित करून, अमित याचा कट करून खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Related Stories

मंत्री शंभूराज देसाई यांच्या ताफ्यातील पोलिसांना कोरोनाची बाधा

Patil_p

लाचखोरीत प्रशासनाचे खच्चीकरण नको

Patil_p

सोलापूर शहराने ओलांडला पाच हजार पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा

Archana Banage

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 27 हजार 500 कुटुंबाचा सर्व्हे पूर्ण

Patil_p

तपास अधिकाऱयांना अडकवून तो देखील अडकला

Patil_p

चंदगडच्या कोवाडमध्ये पावसाचा जोर वाढला; पुराच्या भीतीने बाजारपेठेतील व्यापारी धास्तावला

datta jadhav