Tarun Bharat

आर्थिक संकटातील आंबा उत्पादकांची शासनाने घ्यावी दखल

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

लॉकडाऊनमुळे येथील आंबा व्यवसायिक आर्थिक दृष्टय़ा संकटात आहे. याबाबत जिह्यातील शेतकऱयांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींची भेट घेवून वस्तुस्थिती समजावून दिली आहे. खत व्यस्थापनापासून आंबा उत्पादनासाठी येणारा खर्च अधिक असून आंबा पिकाला मिळणारा दर यामुळे आर्थिक गणित विस्कटत आहे. त्याची शासनाने दखल घेवून योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याची मागणी आंबा उत्पादकांकडून केली जात आहे.

  हवामानावर अवलंबून असलेल्या येथील आंबा पिकाचे उत्पादनात वर्षागणिक घट होत आहे.  गेल्या 10 वर्षात उत्पादकांची परिस्थिती बिकट बनली आहे. आंबा पिकासाठी कर्ज घेणाऱया शेतकऱयांना कर्जाची परतफेड करत असताना रक्कमेची जुळवाजुळव करावी लागते. पिक कर्ज नवीन-जुने करून घ्यावे लागते. त्यामुळे कर्जदारांच्या हातात काहीच राहत नाही. गेल्या हंगामात आंबा बाजारात येण्यावेळीच नेमके लॉकडाऊन घोषित करण्यात आले. बाजारपेठा बंद असल्याने विक्रीवर परिणाम झाला. आंबा नाशवंत असल्याने खासगी विक्रेत्यांना मिळेल त्या दराने आंबा शेतकऱयांना विकण्याची वेळ आली होती. त्याचा येथील सर्वसामान्य शेतकऱयांना सर्वाधिक फटका बसला होता.

   सन 2014-15 च्या हंगामामध्ये फेब्रुवारी-मार्चच्या सुरूवातीला अवकाळी पाऊस झाला. त्याचा महसुल सर्व्हे होऊन तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 महिन्याचे पीक कर्जावरील व्याज माफ केले. त्याचप्रमाणे कर्जाचे पुर्नगठन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यावरील व्याज माफ करण्याचा अध्यादेश काढला. मात्र अद्याप 80 टक्के व्यवसायिक पुर्नगठण व्याज माफीपासून वंचित असल्याचे सांगितले जात आहे.

Related Stories

जिल्हय़ात 200 एकर जागेत नवा प्रकल्प

Patil_p

रत्नागिरीत रेल्वे पोलिसांच्या ताब्यातून अट्टल चोरटा पसार

Abhijeet Shinde

तळीरामांचा अखेर संयमाचा बांध फुटला

Abhijeet Shinde

राष्ट्रवादी क्राँग्रेसच्यावतीने पुरग्रस्तांना धान्य व ताडपत्री वितरण

NIKHIL_N

कोकणातील जांभा दगड चिरेखाणींना, आठ दिवसात परवानगी

Abhijeet Shinde

मालवणच्या सुकन्येचा गोवा शासनातर्फे सन्मान

NIKHIL_N
error: Content is protected !!