Tarun Bharat

आर्यनच्या कोठडीत वाढ, अनन्या पांडेची चौकशी

ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती वाढणार : बॉलिवूडमधील अनेकजण टार्गेटवर : अनेक स्टार किड्सची नावे उघड होण्याची शक्यता

प्रतिनिधी /मुंबई

कँडिलिया डग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आणखी दहा दिवसांची वाढ केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनडीपीएस कोर्टात आर्यन खानसह सात जणांना गुरुवारी हजर करण्यात आल्यानंतर 30 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे अभिनेत्री अनन्या पांडे हिला एनसीबीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावून घेतले. त्याचबरोबर ती वापरत असलेल्या मोबाईल्स अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ताब्यात घेतली आहेत. अनन्याची सुमारे दोन तास कसून चौकशी केल्यानंतर तिला सोडण्यात आले असले तरीही शुक्रवारी सकाळी पुन्हा बोलावण्यात आले आहे.

दरम्यान आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली असली तरी तिथेही जामीनाचा विचार झाला नसून यावरील सुनावणी आता मंगळवार 26 रोजी करण्यात येणार आहे. जर त्यावेळी जामीन मिळाला नाहीतर आर्यनला 14 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगातच रहावे लागणार आहे. तर राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांनी गुरुवारी पुन्हा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आगपाखड करत त्यांनी मालदीवमधून सेलिब्रेटींकडून वसुली केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांचा वानखेडेंनी इन्कार केला आहे.

गुरुवारी एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेच्या निवासस्थानी जाऊन तिला नोटीस बजावली तसेच तिच्या वापरातील इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस ताब्यात घेतली. तिची गुरुवारी सायंकाळी दोन चौकशी केली असून पुन्हा एकदा शुक्रवारी बोलावण्यात आले आहे. आर्यनच्या व्हॉट्सऍप चॅटमध्ये तिचे नाव आल्याने एनसीबीने ही कारवाई केली आहे. या डिव्हाईसमधून आणखी नावे उघड होण्याची शक्यता वर्तवली असून बॉलिवूड आणि स्टार किड्स पुन्हा एकदा एनसीबीच्या रडारवर आले आहेत. किमान पाचजण तरी यामध्ये सापडू शकतात, असे म्हटले जात आहे.

एनसीबीच्या अधिकारी गुरुवारी पुन्हा एकदा मन्नतवर गेल्याने छापा टाकल्याची चर्चा सुरु झाली. तथापि ही कारवाई केवळ कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी होती असे सांगण्यात आले. त्याचबरोबर शहारुखची सेक्रेटरी पूजा दलनानी हीला नोटीस बजावली असून आर्यनच्या शैक्षणिक व वैद्यकीय माहितीची मागणी केली असून त्याच्या वापरातील इतर इलेक्^टॉनिक्स डिव्हाईस असल्यास ती सोपवण्याचे आदेश दिल्याचे एनसीबीने म्हटले आहे.

तर तब्बल 20 दिवसांनंतर शहारुख आणि आर्यन खानची गुरुवारी भेट झाली. सकाळीच शहारुख खान याने आर्यनची आर्थररोड जेलमध्ये जाऊन भेट घेतली. तुरुंग नियमानुसार त्यांना दहा मिनिटे बोलण्याची संधी दिली. काचेच्या केबीनमधून दोघांनी इंटरकॉमवरुन संवाद साधला. त्यावेळी दोघेही दुःखी झाल्याचे सांगण्यात आले.

 दिवसभरात या घडामोडी सुरु असताना राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा आरोपांची आगपाखड केली आहे. कोरोनाकाळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे तेथे काय करत होते, असा प्रश्न करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी मालदीवमध्ये वसुली केल्याचा खळबळजनक आरोप केला.

समीर वानखेडे यांनी मंत्री मलिक यांच्या आरोपाचा इन्कार केला आहे. आपण कधीही मालदीवच काय परदेशीही गेलो नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्री असूनही ते खोटे बोलत असून त्यांनी आता हे कार्टून नेटवर्क चालवणे बंद करावे. आपण त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे काम सुरु केल्यापासून काही लोक एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि आपल्या कारवाया सुरुच राहतील, असेही वानखेडे म्हणाले.

Related Stories

सलमान खानला पुन्हा दिलासा

Patil_p

मतदानाच्या सुटीचा व्हावा योग्य वापर

Patil_p

भारताच्या सर्व सीमा पूर्णतः सुरक्षित

Patil_p

बसप सत्तेवर आल्यास गुंड-माफिया तुरुंगात

Patil_p

महेंद्रसिंग धोनी भाजपमध्ये येणार?

Patil_p

देशाला 35 ऑक्सिजन प्रकल्प समर्पित

Amit Kulkarni